RRB Recruitment 2024 Marathi : रेल्वेने आणली 1376 पदांसाठी नवीन भरती पॅरामेडिकल पदांसाठी सर्व माहिती जाणून घ्या

RRB Recruitment 2024 Marathi
RRB Recruitment 2024 Marathi

RRB Recruitment 2024 Marathi : भारतीय रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या सर्व पात्र उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण रेल्वे बोर्डाने (RRB विविध विभागामध्ये पॅरा-मेडिकल पदांसाठीच्या भरती ची एक अधिसूचना जाहीर केली आहे. या भरती च्या प्रक्रियेच्या माध्यमातून तब्बल 1376  रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

जवळपास सहा वर्षांनंतर, रेल्वे भरती मंडळाने RRB पॅरामेडिकल भर्ती 2024 जाहीर केली आहे, जी भारतीय रेल्वेच्या पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांमध्ये पदांची मागणी करणाऱ्या उमेदवारांकडून असंख्य अर्ज येतील अशी अपेक्षा आहे. अशीच इंडिया पोस्ट नेही आकर्षक भरती जाहीर केली आहे इंडिया पोस्ट GDS भरती ह्याबद्दल सुद्धा नक्की वाचा.

या भरतीसाठी अर्ज करण्याची साठीची प्रक्रिया 17 ऑगस्ट 2024 पासून सुरू झाली असून ती 16 सप्टेंबर 2024 पर्यंत असणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार रेल्वे भरती बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या भरतीप्रक्रिये बद्दलची अधिक माहिती रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आली आहे.

त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती प्रक्रियेसंदर्भातील तपशील जसे की, शैक्षणिक पात्रता, अर्ज शुल्क, नोकरीचे ठिकाण आणि पगार याबाबतची माहिती जाणून घ्यावी आणि मगच अर्ज करावा. 

रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) ने 2024 साठी पॅरामेडिकल पदांच्या भरतीसाठी नवीन मोठी घोषणा केली आहे. एकूण 1376 पदांसाठी भरती होणार आहे. या लेखात, RRB पॅरामेडिकल भर्ती 2024 बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. यातून तुम्हाला नोकरीच्या वर्णनांपासून अर्ज करण्याच्या प्रक्रियेपर्यंत सर्व माहिती मिळेल.

RRB Paramedical Recruitment 2024

RRB Paramedic Recruitment 2024 ची ठळक वैशिष्ठये खाली दिल्याप्रमाणे आहेत.

विवरणतपशील
पोस्टRRB पॅरामेडिकल स्टाफ
अधिसूचना प्रकाशन तारीख08 ऑगस्ट 2024
अर्ज सुरू होण्याची तारीख17 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख16 सप्टेंबर 2024
परीक्षा स्तरराष्ट्रीय
पात्रतापदांसह भिन्न
परीक्षेचे टप्पेसंगणक आधारित चाचणी (CBT) आणि दस्तऐवज पडताळणी
पात्रतानिर्दिष्ट केल्यानुसार संबंधित विषयातील पदवी/डिप्लोमा
अधिकृत वेबसाइटhttps://www.rrbapply.gov.in/
RRB Application 2024 Important Links
PDF जाहिरात 📑 Para-Medical Recruitment
ऑनलाईन अर्ज करा 👉 Apply Here
अधिकृत वेबसाईट https://www.rrbapply.gov.in/
RRB Application 2024 Important Links

RRB Recruitment 2024 Marathi

RRB Recruitment 2024 साठी सेंट्रलाइज्ड एम्प्लॉयमेंट नोटिस (CEN) नं. 04224 जारी करण्यात आले आहे. अर्ज ऑनलाइन सादर करायचा आहे. अर्ज करण्याची तारीख 17 ऑगस्ट 2024 ते 9 सप्टेंबर 2024 पर्यंत आहे.

रेल्वेच्या म्हणण्यानुसार, एकूण १३७६ पदांसाठी हि भरती केली जाणार आहे. यामध्ये नर्सिंग सुपरिटेंडेंट (७१३), डायटीशियन (०५), ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट (०४), क्लिनिकल सायकोलॉजिस्ट (०७), डायलिसिस टेक्निशियन (२०), फार्मासिस्ट (२४६) डेंटल हाइजीनिस्ट (०३) हेल्थ & मलेरिया इंस्पेक्टर ग्रेड III(१२६),ऑक्यूपेशनल थेरेपिस्ट (०२), कॅथ लॅब टेक्निशियन (०२), रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन (६४), स्पीच थेरपिस्ट (०१), अशा पदांचा समावेश आहे. पदांची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे

पदांबद्दलची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

पोस्टरिक्त पदांची संख्या
आहारतज्ञ (स्तर 7)5
नर्सिंग अधीक्षक713
ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट4
क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ7
दंत आरोग्यतज्ज्ञ3
डायलिसिस तंत्रज्ञ20
आरोग्य आणि मलेरिया निरीक्षक Gr III126
प्रयोगशाळा अधीक्षक27
परफ्युजनिस्ट2
फिजिओथेरपिस्ट ग्रेड II20
व्यावसायिक थेरपिस्ट2
कॅथ प्रयोगशाळा तंत्रज्ञ2
फार्मासिस्ट (प्रवेश श्रेणी)246
रेडिओग्राफर एक्स-रे तंत्रज्ञ64
स्पीच थेरपिस्ट1
कार्डियाक टेक्निशियन4
ऑप्टोमेट्रिस्ट4
ईसीजी तंत्रज्ञ13
प्रयोगशाळा सहाय्यक ग्रेड II84
फील्ड वर्कर19
एकूण1376
RRB Recruitment 2024 Marathi

RRB Paramedic Recruitment 2024 पात्रता निकष

वयोमर्यादा

वयोमर्यादा प्रत्येक पदासाठी वेगवेगळी आहे. सामान्यतः, 18 ते 43 वर्षे वयोमर्यादा आहे. वयोमर्यादा 12 नोव्हेंबर 2025 रोजी तपासली जाईल.

सर्व पदांसाठी वयोमर्यादा खाली दिल्याप्रमाणे आहे.

पोस्टवयोमर्यादा
आहारतज्ञ (स्तर 7)18-36
नर्सिंग अधीक्षक20-43
ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट21-33
क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ18-36
दंत आरोग्यतज्ज्ञ18-36
डायलिसिस तंत्रज्ञ20-36
आरोग्य आणि मलेरिया निरीक्षक Gr III18-36
प्रयोगशाळा अधीक्षक18-36
परफ्युजनिस्ट21-43
फिजिओथेरपिस्ट ग्रेड II18-36
व्यावसायिक थेरपिस्ट18-36
कॅथ प्रयोगशाळा तंत्रज्ञ18-36
फार्मासिस्ट (प्रवेश श्रेणी)20-38
रेडिओग्राफर एक्स-रे तंत्रज्ञ19-36
स्पीच थेरपिस्ट18-36
कार्डियाक टेक्निशियन18-36
ऑप्टोमेट्रिस्ट18-36
ईसीजी तंत्रज्ञ18-36
प्रयोगशाळा सहाय्यक ग्रेड II18-36
फील्ड वर्कर18-33
RRB Paramedic Recruitment 2024 पात्रता निकष

नोट : चुकीचे कागदपत्रे आणि चुकीची वयोमर्यादा आढळून आल्यास उमेदवाराचा अर्ज कोणत्याही स्थरावर अपात्र केला जाईल याची नोंद घ्यावी.

RRB Paramedical Application Fee

RRB पॅरामेडिकल भरती 2024 साठी अर्ज फी इंटरनेट बँकिंग, डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा UPI द्वारे ऑनलाइन भरता येते. फी खालीलप्रमाणे आहेत.

सर्व उमेदवारांसाठी: ₹500
SC, ST, माजी सैनिक, PwBD, महिला, ट्रान्सजेंडर, अल्पसंख्याक किंवा आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (EBC): ₹250

CategoryRRB Technician Application Fee (INR)
SC / ST / Ex-Serviceman / Female / Transgender / Minorities / Economically backward class.(The fee for these categories shall be refunded after deducting bank charges as applicable, on appearing in CBT)250
Others500
RRB Paramedical Application Fee

RRB Paramedical Recruitment शैक्षणिक पात्रता

पोस्टपात्रता
डायटिशियनB.Sc. डायटेटिक्स किंवा पोस्ट ग्रॅजुएट डिप्लोमा
नर्सिंग सुपरिटेंडेंटB.Sc. नर्सिंग
ऑडियोलॉजिस्ट आणि स्पीच थेरापिस्टऑडियोलॉजी आणि स्पीच थेरपी मध्ये डिग्री
क्लिनिकल सायकोलॉजिस्टक्लिनिकल सायकोलॉजी मध्ये पदवी
डेंटल हायजिनिस्टB.Sc. आणि डेंटल हायजीन मध्ये डिप्लोमा
डायलिसिस टेक्निशियनB.Sc. किंवा समकक्ष डिप्लोमा
हेल्थ आणि मलेरिया इन्स्पेक्टर ग्रेड IIIB.Sc. रसायनशास्त्र किंवा संबंधित विषय
लॅबोरेटरी सुपरिटेंडंट ग्रेड IIIB.Sc. जीवनशास्त्र किंवा बायोकॅमिस्ट्री
पर्फ्यूजनिस्टB.Sc. आणि पर्फ्यूजन टेक्नोलॉजी मध्ये डिप्लोमा
फिजिओथेरपिस्ट ग्रेड IIफिजिओथेरपी मध्ये डिग्री
ऑक्यूपेशनल थेरपिस्टऑक्यूपेशनल थेरपी मध्ये डिग्री
कॅथ लॅबोरेटरी टेक्निशियनकॅथ लॅब टेक्नोलॉजी मध्ये डिप्लोमा
फार्मासिस्ट ग्रेड IIIफार्मसी मध्ये डिप्लोमा
रेडियोग्राफर एक्स-रे टेक्निशियनरेडियोग्राफी मध्ये डिप्लोमा
स्पीच थेरपिस्टस्पीच थेरपी मध्ये डिग्री
कार्डियाक टेक्निशियनB.Sc. कार्डियाक टेक्नोलॉजी मध्ये
ऑप्टोमेट्रिस्टB.Sc. ऑप्टोमेट्री मध्ये
ECG टेक्निशियनECG टेक्नोलॉजी मध्ये प्रमाणपत्र
लॅबोरेटरी असिस्टंट ग्रेड II12 वी पास आणि MLTT डिप्लोमा
फील्ड वर्कर12 वी पास आणि संबंधित अनुभव
RRB Paramedical Recruitment शैक्षणिक पात्रता

RRB पॅरामेडिकल भरतीच्या परीक्षेची तारीख 2024

RRB पॅरामेडिकल भरती 2024 च्या परीक्षेची तारीख त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात येईल. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2024 आहे.

ही परीक्षा संगणक-आधारित चाचणी असेल ज्यामध्ये व्यावसायिक क्षमता, सामान्यज्ञान जागरूकता, अंकगणित, सामान्य बुद्धिमत्ता आणि सामान्य विज्ञान समाविष्ट असलेल्या 100 MCQ प्रश्न असतील. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुणांचे नकारात्मक चिन्ह असेल.

RRB Paramedical Notification 2024 Salary Details

Post NameSalary (Per Month)
DieticianRs. 44,900/-
Nursing Superintendent
Audiologist & Speech TherapistRs. 35,400/-
Clinical Psychologist
Dental Hygienist
Dialysis Technician
Health & Malaria Inspector Gr III
Lab Superintendent Gr III
Perfusionist
Physiotherapist Grade II
Occupational Therapist
Cath Lab Technician
Pharmacist (Entry Grade)Rs. 29,200/-
Radiographer X-Ray Technician
Speech Therapist
Cardiac TechnicianRs. 25,500/-
Optometrist
ECG Technician
Lab Assistant Grade IIRs. 21,700/-
Field WorkerRs. 19,900/-
RRB Paramedical Notification 2024 Salary Details

RRB परमेटिकल भरती साठी अर्ज कसा करावा

1. आधिकारिक वेबसाइटवर जा: RRB ची अधिकृत वेबसाइट किंवा अर्ज सादर करण्याच्या पोर्टलवर जा.
2. नोंदणी करा: वैध ई-मेल आयडी आणि फोन नंबरसह अकाउंट तयार करा.
3. अर्ज भरा: वैयक्तिक, शैक्षणिक आणि अनुभवाची माहिती भरा.
4. कागदपत्रे अपलोड करा: आवश्यक कागदपत्रे आणि फोटोग्राफ अपलोड करा.
5. अर्ज शुल्क भरा: सामान्य/ओबीसी साठी ₹500 आणि SC/ST/PWD साठी ₹250.
6. सबमिट करा: अर्ज पुनरावलोकन करा आणि अंतिम मुदतीपूर्वी सबमिट करा.

RRB Recruitment 2024 Marathi
RRB Recruitment 2024 Marathi

RRB पॅरामेडिकल भरती 2024 निवड प्रक्रिया

पॅरामेडिकल पदांसाठी निवड प्रक्रिया ऑनलाइन कंप्युटर आधारित चाचणी (CBT) द्वारे केली जाईल. परीक्षा 100 MCQ प्रश्नांची असेल:

1. व्यावसायिक क्षमता: 70 प्रश्न
2. सामान्य माहिती: 10 प्रश्न
3. सामान्य अंकगणित: 10 प्रश्न
4. सामान्य बुद्धी आणि तर्कशास्त्र: 10 प्रश्न
5. सामान्य विज्ञान: 10 प्रश्न

परीक्षा पॅटर्न

1. कालावधी: 90 मिनिटे
2. एकूण गुण: 100
3. नेगेटिव्ह मार्क: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 मार्क कापले जातील.

निष्कर्ष

रेल्वे RRB पॅरामेडिकल भर्ती 2024 ही भारतीय रेल्वेमध्ये करिअर बनवण्यासाठी एक उत्तम आणि महत्त्वाची संधी आहे. 1376 पदांसाठी भरती होणार आहे. पात्रतेच्या निकषांची, अर्ज प्रक्रिया आणि निवड प्रक्रियेची माहिती घेऊन तयारी करा, म्हणजे तुम्हाला चांगली संधी मिळू शकते. या संधीचा योग्य फायदा घ्या. या भरती साठी परीक्षेमध्ये नेगेटिव्ह मार्क सिस्टिम आहे त्यामुळे यासाठी चांगली तयारी करा. विविध पदे असल्यामुळे चांगल्या संधी निर्माण झाल्या आहेत.

RRB Recruitment 2024 Marathi तुम्हाला हा लेख कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा

जयहिंद!!! जय महाराष्ट्र!!!

RRB Recruitment 2024 FAQ

RRB पॅरामेडिकल भरती 2024 ची अधिसूचना कधी जाहीर झाली?

RRB पॅरामेडिकल भरती 2024 ची अधिसूचना 8 ऑगस्ट 2024 रोजी जाहीर झाली.

RRB पॅरामेडिकल भरती 2024 अर्ज करण्याची तारीख काय आहे?

अर्ज 17 ऑगस्ट 2024 पासून सुरू होईल आणि 16 सप्टेंबर 2024 पर्यंत चालेल.

RRB पॅरामेडिकल भरतीसाठी एकूण किती पदे उपलब्ध आहेत?

एकूण 1376 पदे उपलब्ध आहेत.

अर्ज फी किती आहे?

सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी ₹500 आणि SC/ST/PWD उमेदवारांसाठी ₹250 आहे.

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख काय आहे?

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2024 आहे.

अर्ज कसा करावा?

अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी करा, अर्ज भरा, कागदपत्रे अपलोड करा, अर्ज शुल्क भरा आणि सबमिट करा.

Leave a Comment