Diwali Wishes in Marathi : ” उठा उठा दिवाळी आली, मोती साबणाने अंघोळ करायची वेळ झाली ” हे शब्द तर सर्वानाच माहिती असतील च , लहानपनी दिवाळी चे दिवस जवळ आले कि टेलिव्हिजन वरती हे शब्द नेहमी ऐकायला यायचे. दिवाळी हा सण आपल्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी खूप मोठा आणि उत्साहदायी सण आहे. घरामधील सर्व लहान आणि मोठे व्यक्ती दिवाळी ची आतुरतेने वाट बघत असतात. काहींना नवीन कपड्याची आतुरता असते , तर काहींना फटाके फोडण्याची आणि सर्वाना आतुरता असते ती गड-किल्ले बनवायची. या दिवाळी सणा च्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही घेऊन आलोय Diwali Wishes in Marathi हा लेख.
Happy Diwali | हैप्पी दिवाळी
दिवाळीच्या सुट्ट्या सुरु झाल्या कि लहान मुले किल्ले बनवण्याच्या मागे गुंतलेली असतात. ती मजाच काय वेगळी असते, किल्ले बनविण्या पेक्षा सर्वांसोबत चा मिळालेला वेळ आणि गमती जमती च्या आठवणी खूप महत्वाच्या आहेत. आणि याच आठवणी आल्या सोबत राहतात. तसेच आपण दिलेल्या शुभेच्छा सुद्धा आपल्या नातेवाईकांच्या आणि मित्र मंडळींना अश्याच आठवणीत रहाव्या म्हणून आज आम्ही घेऊन आलो आहोत Diwali Wishes in Marathi. Diwali 2024
चला तर मग मंडळी बघुयात आपण Diwali Wishes in Marathi या लेख मध्ये…..
तसेच आमच्या Marathi Ukhane आणि Birthday wishes for wife या लेखना सुद्धा भेट द्या , आम्हाला खात्री आहे कि हे लेख तुम्हाला नक्की आवडतील..
Diwali Wishes in Marathi 2024
Diwali 2024
दिवाळी ह्या वेळी १ नोव्हेबंर २०२४ रोजी आहे , तरी धनत्रयोदशी म्हणजेच दिवाळीचा पहिला दिवस हा २९ ऑक्टोबर २०२४ रोजी आहे.
दिवाळी बद्दलची माहिती आपण आमच्या Diwali Wishes in Marathi या लेखात म्हणजेच खाली बघणार आहोत चाल तर मग जाणून घेऊ शिवली सण बद्दल.
Diwali Wishes in Marathi
दिवाळी चा सण पाच दिवस चालतो – धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज. दिवाळी चा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी किंवा संपत्तीची पूजा. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते आणि मौल्यवान वस्तू खरेदी केल्या जातात अशी प्रथा आहे. दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी किंवा छोटी दिवाळी. या दिवशी लोक सकाळी लवकर उठून स्नान करण्यापूर्वी त्याना सुगंधी तेल आणि उठणे लावतात त्यामुळे त्यांचे सर्व पाप आणि अशुद्धता बाहेर पडावी म्हणून.
तिसरा दिवस मुख्य उत्सव असतो या दिवशी देवीची ( संपत्तीची ) पूजा केली जाते याला लक्ष्मी पूजन असेही म्हणतात. लोक नवीन कपडे, वस्तू या दिवशी खरेदी करतात , तसेच फटाके लावून आणि मिठाई वाटून साजरा करतात . दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे गोवर्धन पूजा किंवा पाडवा. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने विशाल गोवर्धन पर्वत उचलून इंद्राचा प्रभाव केला होता असे म्हणतात. दिवाळीचा पाचवा दिवस म्हणजे भाऊबीज. या दिवशी भिन्न भावाला ओवाळते. बहिणी आपल्या भावच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना करते. आणि भाऊ बहिणींना भेट वस्तू देतात.
दिवाळी ज्याला दीपावली असे सुद्धा म्हणतात , हा एक प्रकाशाचा हिंदू सण आहे. जो अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगला आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय साजरा करतो. हा भारतातील आणि जगभरातील हिंदू मध्ये सर्वात लोक प्रिय सण आहे. दरवर्षी दिवाळी आश्विन आणि कार्तिक या महिन्यातील अमावसेच्या रात्री येते. दरवर्षी साधारण पणे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये येतो.
या वर्षी दिवाळी 29 October 2024 या दिवशी आली आहे आहे. Diwali Wishes in Marathi
स्नेहाचा सुगंध दरवळला आनंदाचा सण आला
एकच मागणे दिवाळी सणाला सौख्य समृध्दी लाभो तुम्हा सर्वांना
दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा
दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी इडा पिडा जाऊ दे बळी च राज येऊ दे
दिपावलीच्या मंगलमय शुभेच्छा
हैप्पी दिवाली
लागले दिवे दारी उजळल्या ज्योती
रंगात रंगली रांगोळी अंगणी आली दिवाळी ही घरो घरी
दिवाळीच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे,
लक्ष्मी च्या पावलांनी घर सुख समृद्धीने भरू दे …
शुभ दीपावली !
लक्ष दिव्यांनी उजळली निशा घेऊनि नवी उमेद ,
नवी आशा होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा ,
दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !
कुंकवाच्या पावलांनी आली देवी लक्ष्मी आपल्या दारी ,
या दिवाळी ला करूया लक्ष्मीची आराधना .
दिवाळीच्या हार्दिक शुभेछा !
पहिला दिवा आज लागला दारी ,
सुखाची किरणे घेई घरी ,
पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा ,
दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा !
फटाके , कंदील अन , पणत्यांची रोषणाई ,
चिवडा चकली, लाडू करंज्याची हि लज्जतच न्यारी ,
नव्यानवलाईची दिवाळी येता ,
आनंदली दुनिया सारी !
शुभ दीपावली !
दिवाळीची आली पहाट , रांगोळ्यांचा केला थाट ,
अभ्यंगाला मांडले पाट , उटणी अत्तराचा घमघमाट …
लाडू चकल्या कारंज्यानी सजले ताट ,
पणत्या दारात एकशेआठ , आकाश दिव्यांची झगमगाट ..
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा !
घेऊनि दिव्यांचा प्रकाश सोनेरी , मालवणी गंध मधुर उटण्याचा …
करा संकल्प सुंदर जगण्याचा , गाठून मुहूर्त दिवाळीच्या सणाचा …
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !
तुमच्या दारी सजो ,
स्वर्ग सुखांची आरास ,
लक्ष्मी नांदो सदनी
धन धन्याची वोसंडो रस
दिवपावलीच्या शुभेच्छा !
दिपावली च्या आत्ताच्या दिवसा पासून ते भाऊबीज पर्यंतच्या,
साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही,
मंगलमय पर्वा निमित्त आपणास व आपल्या
परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
महालक्ष्मीचे पूजन करून , लावा दीप अंगणी ..
धन-धान्य आणि सुख-समृद्धी, लाभो तुमच्या जीवनी..
लक्ष्मीपूजन आणि दिवाळी निमित्त मंगलमय शुभेच्छा !
Diwali Message in Marathi | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी 202४
दिवाळी अशी खास,
तिच्यात लक्ष्मीचा निवास…
फराळाचा सुगंधी वास,
दिव्यांची आरास…
मनाचा वाढवी उल्हास,
अशा दिवाळीच्या शुभेच्छा…
तुमच्यासाठी खास !!
हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दीची, भरभराटीची, आनंदाची जावो…
।। शुभ दिपावली ।।
जीवन रूप आपल्या तेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी ,
खरोखरच अलौकिक असून,
हि दिवाळी आपणाससुख, समाधान, आणि वैभवाच्या दीपमाळांनी,
जीवन लखलखीत करणारी असावी …
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
सौभाग्याचे दीप उजळती ,
मांगल्याची चाहूल लागली ,
शब्दाचीही सुमने फुलती,
येत घरोघरी दीपावली …
दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा !
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी,
शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी,
कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी…
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
हि दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना सुखाची,
सम्रुद्धीची व आनंदाचा जावो…
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
दारी दिव्यांची आरास,
अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,
आनंद बहरलेला सर्वत्र,
आणि हर्षलेले मन,
आला आला दिवाळी सण,
करा प्रेमाची उधळण…
हैप्पी दिवाली
सगळा आनंद, सगळे सौख्य,
सगळ्या स्वप्नांची पूर्णता,
यशाची सगळी शिखरे, सगळे ऐश्वर्य,
हे आपल्याला मिळू दे…
हि दीपावली आपल्या आयुष्याला,
एक नवा उजाळा देऊ दे…
दीपावलीच्या तेजोमय शुभेच्छा!
आली दिवाळी
उजळला देव्हारा..अंधारात या
पणत्यांचा पहारा..प्रेमाचा संदेश
मनात रुजावा..आनंदी आनंद
दिवसागणिक वाढावा…
दिवाळीच्या शुभेच्छा!
Happy Diwali 2024 Marathi Wishes
धनाची पूजा, यशाचा प्रकाश,
कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन,
संबंधाचा फराळ, समृद्धीचा पाडवा,
प्रेमाची भाऊबीज अशा या दीपावलीच्या
आपल्या सहकुटुंब, सह परिवारास सोनेरी शुभेच्छा !!!
फटाके, कंदील अन् पणत्यांची रोषणाई,
चिवडा-चकली, लाडू-करंजीची ही लज्जतच न्यारी,
नव्यानवलाईची दिवाळी येता, आनंदली दुनिया सारी!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!
पुन्हा एक नवे वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा
नवे स्वप्न, नवे क्षितीज,
सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट..
दिव्यांची आरास, फराळाचे ताट..
फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट..
नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट..
शुभ दीपावली..!
Diwali Wishes in Marathi । दिवाळीच्या शुभेच्छा
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे.
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी,
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं,
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी,विद्यालक्ष्मी,
कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत…
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…!!!!
तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!!
उत्कर्षाची वाट उमटली
विरला गर्द कालचा काळोख…
क्षितिजावर पहाट उगवली,
घेऊनिया नवा उत्साह सोबत…
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,
आली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,
उजळेल आयुष्याची वहिवाट !!,
शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली…!!!
आनंदाचे गाणे गात दिवाळी येते अंगणात,
सुखाची मग होते बरसात तेजाची मिळते साथ.
हि दिवाळी आनंदाची, सुखसमृध्दीची जावो…!!
सोनेरी प्रकाशात,
पहाट सारी न्हाऊन गेली,
आनंदाची उधळण करीत,
आली दिवाळी आली,
नवे लेणे भरजारी,
दारी रांगोळी न्यारी,
गंध प्रेमाचा उधळीत,
आली आली दिवाळी आली…!!!
मराठमोळी संस्कृती आपली
मराठमोळा आपला बाणा
मराठमोळी माणसे आपण
मराठमोळी आपली माती
अशीच चिरंतन राहो
आपली ही प्रेमाची नाती
शुभ दिपावली…!!!
दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी
सुखाचे किरण येती घरी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा
माझ्याकडून दिपावली हार्दिक शुभेच्छा
यशाची रोशनी, समाधानाचा फराळ,
मंगलमय रांगोळी,
मधुर मिठाई, आकर्षक आकाशकंदील,
आकाश उजळवणारे फटाके,
या दिवाळीत हे सगळं तुमच्यासाठी
दिवाळीनिमित्त सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा…!!!
नक्षत्रांची करीत उधळण, दीपावली ही आली..
नवस्वप्नांची करीत पखरण, दीपावली ही आली..
सदिच्छांचे पुष्पे घेउनी, दीपावली ही आली..
शुभेच्छांचे गुच्छ घेउनी, दीपावली ही आली..
दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा!!!
Diwali Padwa wishes for Husband in Marathi
चंद्राचा कंदील घरावरी,
चांदण्यांचे तोरण दारावरी..
क्षितीजाचे रंग रांगोळीवरी,
दिवाळीचे स्वागत घरोघरी..!!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
शुभ दीपावली…!!!
दारी दिव्यांची आरास,
अंगणी फुलला सडा रांगोळीचा खास,
आनंद बहरलेला सर्वत्र,
आणि हर्षलेले मन,
आला आला दिवाळी सण,
करा प्रेमाची उधळण…
दिवाळीच्या प्रेमळ शुभेच्छा!!!
चिमूटभर माती म्हणे, मी होईन पणती,
टीचभर कापूस म्हणे, मी होईन वाती
थेंबभर तेल म्हणे, मी होईन साथी
ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती
अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती.! !!
दिपावलीच्या हार्दिक शुभेछा!!!
दिवाळी अशी खास, तिच्यात लक्ष्मीचा निवास,
फराळाचा सुगंधी वास, दिव्यांची आरास,
मनाचा वाढवी उल्हास,
अशा दिवाळीच्या शुभेच्छा तुमच्यासाठी खास !!
हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दीची, भरभराटीची, आनंदाची जावो…!!!
दिवाळीच्या आनंदाच्या लहरी सीमा ओलांडून,
एकता आणि विविधतेच्या उत्सवात अंतःकरणाला जोडू दे.
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
दिवाळी हा वाईटावर चांगल्याचा विजयावर विचार करण्याची वेळ आहे
तुमचे जीवन सद्गुणांचे उज्ज्वल उदाहरण असू दे
दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा !!!
दिव्यांचा प्रकाश तुमच्या जीवनातील अंधार आणि अंधकार दूर करो ,
फटाक्यांच्या आवाजाने उत्सवाची एक सिंफनी निर्माण होवो ,
तुमच्या सभोवताली सदैव सकारात्मक भावना असो ,
या दिवाळीत तुमच्यासाठी संधी आणि यशाचा संदेश.
मेणबत्त्यांची ठिणगी तुमच्या महत्त्वाकांक्षा आणि आकांक्षा प्रज्वलित करो,
यशाने तुम्हाला नेहमी प्रेरणा मिळो.
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !!!
Happy Diwali Wishes In Marathi
आतल्या अंधाराशी लढण्याआधी तुम्ही प्रकाशाचा सण साजरा करू शकत नाही
कपिल राज
तुमच्या प्रत्येक दिव्याला तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी आणि तुमच्या आत्म्याला उजळू द्या.
श्रीशांबव
मातीच्या दिव्याची ज्योत तुमचे हृदय, मन आणि आत्मा शुद्ध करू द्या.
दिवाळीच्या दिव्यांनी तुमचे आयुष्य उजळून निघावे आणि रांगोळीने त्यात आणखी रंग भरावेत.
फटाके आणि मिठाईचा आवाज अधिक आनंद आणि आनंद आणू शकेल.
या दैवी उत्सवाचा आनंद, आनंद आणि आनंद तुम्हाला आयुष्यभर वेढत असेल.
शुभ दिपावली.
सजले स्वयंपाक घर सारे गृहिणीच्या हाती रेसिपी
फराळाची ही मेजवानी आली दिवाली ही घरोघरी
दिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा
उत्सव नात्यांचा रंगला दारी ओवाळी भावासी हर्ष उल्हासाची
आली आली दिवाळी ही घरोघरी
दिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा !!!
Conclusion
दिवाळी हा पाच दिवसाचा सण आहे ज्यामध्ये विविध परंपरा आणि चालीरीती चा समावेश आहे. आपली मराठी संस्कृती मधील चालीरीती जगप्रसिद्ध आहेत. धनत्रयोदशी , नरक चतुर्दर्शी , लक्ष्मी पूजा आणि गोवर्धन पूजा आणि भाई बीज या सारख्या प्रत्येक दिवसाचे आपले आपले वेगळे महत्व आणि नाव आहे. दिवाळी हा कृतज्ञता आणि आनंद व्यक्त करण्याचा एक काळ आहे.
या दिवाळी निमित्त तुम्हाला खूप यश आणि ओळख मिळो हि इच्छा आणि शुभेच्छा ! हि दिवाळी तुम्हाला शांती आणि समृद्धी देवो. खाली काही Best Diwali Wishes जमा केलेले आहेत..
आम्हाला आशा आहे कि तुम्हाला हा Diwali Wishes in Marathi लेख आवडला असेल. Visit Again!!!!!
जय महाराष्ट्र !!! जय हिंद !!!
Read More: Hanuman Chalisa , Diwali 2023