50+Heart Touching birthday wishes for Best Friend In Marathi

Heart Touching birthday wishes for Best Friend In Marathi
Heart Touching birthday wishes for Best Friend In Marathi

Heart Touching birthday wishes for Best Friend: आपल्या सर्वांच्या आयुष्यात मित्र हे खूप खास असतात आणि त्यांचा वाढदिवस आपल्या साठी अविस्मरणीय असतो. त्याच्या साठी हा दिवस खास बनवण्यासाठी तुम्ही त्यांना हृदयस्पर्शी वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रांसाठी देऊ शकता.

या लेख मध्ये आम्ही तुमच्या मित्रांसाठी हृदयस्पर्शी वाढदिवसाच्या शुभेच्छा एकत्रित केल्या आहेत. या शुभेच्या दिल्याने तुमच्या शुभेच्छामुळे तुमच्या मित्रांच्या चेहऱ्या वरती हसू हेही आणि तिचा दिवस अविस्मरणीय होईल अशी मला खात्री आहे.

तसेच या शुभेच्छांच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मित्रांच्या मनामध्ये प्रेमाची भावना निर्माण करू शकता. यामुळे तुमच्या तील मैत्री अजून सदृढ होण्यास मदत होईल.

मित्रांसोबत च आपल्या आयुष्यात आपली लाडकी बहीण सुद्धा आपली एक मैत्रिण च असते, लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या आणि तिचा दिवस खास बनवा.

Heart Touching birthday wishes for Best Friend In Marathi

आपण आपले नातेवाईक निवडू शकत नाही पण आयुष्यात असे मित्र मैत्रीण निवडू शकतो जे आपले कुटुंब होतात. मिंत्रा मंडळी हे आपल्याला आपल्या कुटुंबापेक्षा जवळचे असतात. अश्या आपल्या मित्रमैत्रिणींचे वाढदिवस आपल्यासाठी खास दिवस असतो. आम्ही जमा केलेल्या शुभेच्छा देऊन त्यांचा दिवस खास करा.

Heart Touching birthday wishes in Marathi for Best Friend
तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुला आनंदाने भरून टाकायचंय. मित्रांचं नातं असं असतं, जिथे आनंद, दुःख, हसू, आणि अश्रू सगळं वाटून घेतलं जातं. तुझा हा खास दिवस आहे आणि त्यात आम्ही सर्व मित्रमंडळी तुला सोबत घेऊन हसवू, गाणं गाऊ, आणि एकत्र धमाल करू. एकत्र येऊन साजरा करूया तुझा हा खास दिवस!

दुःख अडवायला उंबऱ्यासारखा ,
वणव्यामध्ये गारव्यासारखा,
निर्णय बरोबर असो वा चुकीचा नेहमी परिस्थितीच्या,
पलीकडे जाऊन सोबत ठामपणे उभा राहणाऱ्या
मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! 🤗🎂

रक्ताची नाती जन्माने मिळतात,
मानलेली नाती मनाने जुळतात,
पण नाती नसतांना हि जीबंधन जुळतात,
त्या रेशीम बंधानाना मैत्री म्हणतात.
माझ्या प्रिय मैत्रिणीला/मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या प्रिय भावा, माझ्या मित्रा वाढदिवसाच्या शुभेच्छा.
मी आशा करतो की तुझ्या आयुष्यात कायम आनंद भरून राहावो तुझी सगळी स्वप्न पूर्ण होऊ दे.
तुझ्यासारखा सच्चा मित्र मला मिळाला म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो.
मित्रा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!

काही मित्र येतात आणि जातात,
मात्र जे मनात घर करून असतात,
ते शेवटपर्यंत साथ देतात,
अशा माझ्या जिवलग मित्राला,
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!

हा शुभ दिवस तुझ्या आयुष्यात हजार वेळा येवो
प्रत्येक वेळी आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देत राहो

माझ्या प्रिय मित्रा, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
तुझा वाढदिवस म्हणजे माझ्यासाठी एक खास दिवस असतो.
तू एक असा व्यक्ती आहेस ज्याच्यामुळे नेहमी दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि हसू असते.
तुझा आनंद आणि हसू हे आमच्यासाठी खूप अनमोल आहे.
प्रिय मित्रा, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

तुझे आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो 
आणि सूर्यासारखे तेजस्वी हो हीच इच्छा 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
मित्र तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!

व्हावास तू शतायुषी
व्हावास तू दीर्घायुषी 
ही एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी 
मित्र तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!

तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून
हे एकच खास वाक्य
मी तुला कधीच विसरणे शक्य नाही 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद आणि यश लाभो
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नवा गंध, नवा आनंद 
निर्माण करत प्रत्येक क्षण यावा 
नवे सुख नव्या वैभवांनी आनंद द्विगुणित व्हावा

सुख, समृद्धी, समाधान, आरोग्य, दीर्घायुष्य तुला लाभो 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नात्यातले आपले बंध कसे शुभेच्छांनी बहरून येतात 
उधळीत रंग सदिच्छांचे शब्द शब्दांना कवेत घेतात 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रत्येक क्षणाला पडावी तुझी भूल, 
खुलावेस तू सदा बनून हसणारे फूल 

तुझ्या इच्छा तुझ्या आकांक्षा 
उंच उंच भरारी घेऊ दे 
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे 

यशस्वी हो, औक्षवंत हो, 
अनेक आशीर्वादासह लाख लाख शुभेच्छा,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

खऱ्या मैत्रीचं प्रतीक आहेस तू,
कितीही दूर असूनही जवळच आहेस तू,
मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Funny Birthday Wishes In Marathi For Friends। मजेशीर वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रमैत्रिणीसाठी

अखिल भारतीय लडकी पटाओ संघटनेचे अध्यक्ष
असंख्य तरूणींच्या हृदयाचे ताईत आणि मोबाईलचा वॉलपेपर असलेले
अशा…ना 143 च्या स्पीडने वाढदिवसाच्या शुभेच्छा 
शुभेच्छुक – अखिल भारतीय माझा नंबर घे संघटना 

आपल्या चालण्या बोलण्यातून आपली इमेज तयार केलेले
स्वतःला फिट ठेवणारे, पुस्तक न उघतानाही कॉलेजमध्ये टॉप मारणारे 
पोरगी दिसली की, अररर लय भारी म्हणणारे
दिलदार व्यक्तीमत्त्वाला आभाळभर शुभेच्छा 

आज भाऊबद्दल कोणीही काही बोलणार नाही कारण 
मित्र नाही भाऊ आहे आपला, रक्ताचा नाही पण जीव आहे आपला
वाढदिवसाच्या शुभेच्छा 

जल्लोष आहे पुऱ्या गावाचा 
वाढदिवस आहे आपल्या छाव्याचा

आपल्या दोस्तीची किंमत नाही 
किंमत करायला कोणाच्या बापाची हिंमत नाही 
वाढदिवसाच्या शुभेच्छा 

 केला तो नाद झाली ती हवा 
कडक रे भावा तूच आहे खरा छावा 
भावाची हवा आता DJ च लावा 
भावाचा birthday आहे #राडा तर होणारच 

साधी राहणी उच्च विचारसरणी असणाऱ्या 
तोंड उघडल्यावर शिव्याच बसरणाऱ्या 
पण मनाने साफ असणाऱ्या 
आमच्या या राणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

स्वतः पण नाचेन दुसऱ्याला पण नाचवेन
दिवसच असा आहे भावा 
जन्म आज तुझा झाला, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस करेन साजरा 
गिफ्टमध्ये  देईन माझी जान, तुझ्यावर आहे मी फिदा
मेरी जान, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 एका गोजिरवाण्या मित्राचं गाढवात रूपांतर झालेल्या 
माझ्या मित्रा तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा 

birthday wishes in marathi for best friend girl | मैत्रिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्या

 या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सर्व स्वप्न साकार व्हावीत
आजचा वाढदिवस आपल्या अनमोल क्षणांची आठवण ठरावी 
या आठवणीने आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

 तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा 
तुझा वाढदिवस जणू सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सखे …!

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे 
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस 
सोन्यासारख्या तुला सोनेरी दिवसाच्या शुभेच्छा 

आला मनसोक्त केक खाण्याचा दिवस 
आला आहे माझ्या खास मैत्रिणीचा वाढदिवस 

प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे
हॅपी बर्थडे

जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो हीच आज देवाकडे मागणी आहे माझी.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

स्वतः पण नाचेन तुलाही नाचवेन
मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस साजरा करेन
गिफ्टमध्ये तुला देईन माझी जान, तुझ्यावर होईन मी फिदा. हॅपीवाला बर्थडे

तुझा वाढदिवस आहे खास 
कारण तू आहेस सगळ्यांसाठी खास 
आज पूर्ण होवो तुझी इच्छा खास Happy Birthday 

आजचा दिवस आमच्यासाठीही आहे खास 
तुला उदंड आयुष्य लाभो, यशस्वी हो, औक्षवंत हो.
वाढदिवसाच्या शुभेच्छा 

नात्यातले आपले बंध कसे शुभेच्छांनी बहरून येतात 
उधळीत रंग सदिच्छांचे शब्द शब्दांना कवेत घेतात 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तू माझ्या जीवनात आनंद भरला
मी तुझे जग फुलांनी सजवीन
मी तुझा प्रत्येक दिवस सुंदर बनवेल
तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

funny birthday wishes for girl best friend in marathi

आयुष्यात सगळी सुख तुला मिळो,
फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको म्हणजे झालं.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, झिपरे!

सगळ्या मुलांमध्ये Crush, स्वीट गर्ल, Attitude गर्ल,
फ्युचर मिस इंडिया अशा विविध नावांनी प्रसिद्ध असलेल्या पोरीला
तिच्या जन्मदिवसाच्या खूप शुभेच्छा!

स्वतःच्या जहर स्माईलने हजारो मुलांना घायाळ करणारी,
कॉलेजमध्ये चॉकलेट गर्ल नावाने प्रसिद्ध असलेल्या वेड्या
मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 

आयुष्यात प्रत्येकांना चांगला मैत्रीण मिळत नाही..
मात्र तू नशीबवान आहेस की,
तुला माझ्यासारखी मैत्रीण मिळाली.
Happy Birthday Dear Best Friend..!

नवा गंध, नवा आनंदअसा प्रत्येक क्षण यावानव्या सुखांनी,
नव्या वैभवांनीआपला आनंद द्विगुणित व्हावा
वाढदिवसाच्या शुभेच्छा ! 

तुझ्या प्रत्येक दिवस स्वप्नां सारखा सुंदर असावा,
तुझ्या प्रत्येक पावलांवर सुखाचा वर्षाव आयुष्यभर व्हावा,
माझ्या लाडक्या मैत्रिणीला फुलांचा गुलदस्त्या भरून खूप साऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

नातं आपल्या मैत्रीचे दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे,
तुझ्या या वाढदिवसादिवशी, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे !
मित्राला/मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Conclusion

आपल्या मित्र मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्याचा दिवस खास बनवला का? आम्हाला नक्की काळवा त्याना तुयमही दिलेल्या शुभेच्छा कशा वाटल्या आणि तुम्हाला आमचा हा Heart Touching birthday wishes for Best Friend In Marathi लेख कसा वाटला.

अश्याच नवणीव वाढदिवसाच्या शुभेच्छा साठी आमच्या Marathiengfusion.com ला भेट देत रहा

आमच्या Facebook Page ला फॉलो करा – Marathi Forum

Leave a Comment