99+ Marathi Ukhane | उखाणे येत नाहीत ? भन्नाट उखाणे मराठी ,लिस्ट एकदा पहाच

Marathi Ukhane : उखाणे येत नाहीत ? जाणून घ्या भन्नाट मराठी उखाणे. उखाणे घायची हि एक मजेशीर आणि जुनी पद्धत आहे मराठी संस्कृती मधील. लग्नाच्या वेळी नवरी किंवा नवरदेव आवडीने जोडीदाराचे नाव घेतात ते उखाण्यांमधून आणि कोण किती चॅन नाव घेत हे ऐकण्यासाठी सारे उत्सुक असतात. खरं तर उखाण्यांची मज्जा लग्नातच असते आणि ती वेगळीच आणि मजेशीर असते. विशेषतः नवरी ला उखाणे घेण्यासाठी खूप आग्रह केला जातो.

Marathi Ukhane
Marathi Ukhane

आज आपण या लेख मध्ये भन्नाट उखाणे घेऊन आलो आहेत मराठी मध्ये खाई जण उखाणे मराठी किंवा हिंदी मध्ये पण घेतात आणि काही मॉडर्न तौच म्हणून मिंग्लिश (मराठी आणि इंग्लिश) अशा प्रकारे उखाणे तयार करतात. आम्ही काही Marathi Ukhane जमा केले आहेत खास तुमच्या साठी. आणि ज्यावेळी आम्ही जमा केलेले उखाणे तुम्ही घ्याल त्यावेळी सगळे तुमची वाहवा करतील!

लग्न हे दोन व्यक्तींच्या आयुष्यातिल एक अविस्मरणीय अनुभव आहे. लग्न नंतर दोन व्यक्ती एकत्र येतात नव्याने आयुष्याला सुरवात करतात. लग्न मध्ये दोन व्यक्ती नाही तर त्याच्या सोबत दोन कुटूंब जुळत असतात. आपल्याकडे विविध सण-समारंभ असतात , विविध सोहळे असतात जसे कि लग्न , घास भरविणे , सत्यनारायण महापूजा , डोहाळे जेवण किंवा इतर कोणताही विशेष कार्यक्रम असो यामध्ये आपल्याला एक मजेशीर परंपरा पहायला मिळते ती म्हणजे नाव घेणे यालाच उखाणे घेणे असे सुद्धा म्हणतात. आपण पहिले तर जे आधीच्या पिढीचे लोक आहेत त्यातील अनेक महिलांना उखाणे तयार करायचा छंद आहे.

या व्यतिरिक्त आमच्या Birthday Wishes for Wife आणि Suvichar in Hindi या लेख सुद्धा वाचा आम्हाला खात्री आहे कि हे तुम्हाला नक्की आवडतील.

Marathi Ukhane For Male ( नवरदेवासाठी )

Marathi Ukhane : नवरी सोबत नवरदेवाला हि लग्नामध्ये आग्रह केला जातो उखाणे घेण्यासाठी यासाठी आम्ही भन्नाट उखाणे नवरदेवासाठी जमा केले आहेत ते खाली दिले आहेत. यातील तुमच्या जोडीदाराला आवडेल असा उखाणा निवडून सगळ्यांना ऐकवा..

Note: रिकाम्या जागी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव टाकायचे आहे.

आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा
_______ च नाव घ्यायला उखाणा कशाला हवा !

काही शब्द येतात ओठातून ,
_______ च नाव येत मात्र माझ्या हृदयातून !

एक होती चिऊ एक होता काऊ ,
_______ च नाव घेतो डोकं नका खाऊ !

हिरव्यागार मैदानात खेळ होतो क्रिकेट ,
_______ ला पाहून पडली माझी विकेट !

सोन्याच्या कपावर ,चांदीची बशी ,
___ च्या समोर फिक्या पडतील रंभा आणि उर्वशी !

Funny Ukhane for Male

Note: रिकाम्या जागी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव टाकायचे आहे.

फुलाच्या तोरणात आंब्याचे पान ,
_______ च्या रूपाने झालो मी बेभान !

आंब्याला आहे फळाच्या राजा चा मान ,
_____ च नाव घेतो , ऐका देऊन कान !

कावळा करतो काव काव चिमणी करते चिव चिव ,
_____ च नाव घेतो , बंद करा टिव टिव !

डाळीत डाळी तुरीची डाळ ,
_____ च्या मांडीवर खेळवीन एका वर्षात बाळ !

सोन्याच्या ताटात खडीसाखरेची वाटी ,
_____ च नाव घेतो , सात जन्मांसाठी !

लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम,
_____ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम!

नववारी साडीचा, खूप सुंदर आहे साज,
______चे नाव घेतो, तिला नजर नको लागो कोणाची आज!

तसा मला काही शौक नाही
पहायचा क्रिकेट,
पण बघता बघता
________च्या प्रेमात पडली माझी विकेट !

जन्म दिला माते ने, पालन केले पित्या ने,
_______च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमा ने !

काय जादु केली, जिंकलं मला एकाक्षणात,
प्रथम दर्शनी च भरली ______ माझ्या मनात !

Marathi Ukhane for Female ( नवरीसाठी )

Marathi Ukhane: लग्न मध्ये सर्वात जास्त आग्रह नवरीलच केला जातो उखाणे घेण्यासाठी म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहेत भन्नाट असे नवीन नवीन उखाणे. ज्यांनी सगळीचे मन खुश होतील तुमची चॉईस बघून/ऐकून. चला तर मग मंडळी बघुयात भन्नाट असे Marathi Ukhane नवरीसाठी

Note: रिकाम्या जागी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव टाकायचे आहे.

रातराणीचा सुगंध, त्यात मंद वारा,
____रावांच्या नांवाचा, भरला हिरवा चुडा.!

सप्तपदीच्या सात पावलांनी मार्ग आक्रमिते नवजीवनाचा,
____च्या संसारात आशा करते आनंदाचा !

मंगलदिनी दिला सर्वांनी प्रेमाचा आहेर, 
____च्या करिता सोडते आज माहेर !

मांगल्याच्या तेजाने अजळतो देव्हारा देवाचा 
_____च्या संसारात फुलो फुलोरा सौख्याचा !

चतुर्थीच्या दिवशी निवडते दुर्वा
____चे नाव घेते आशीर्वाद द्यावा!

निसर्गाच्या अंतरंगात पावित्र्याचा सुवास 
_____च्या जोडीने करिते आयुष्यभराचा प्रवास !

ताजमहाल बांधण्यासाठी कारागीर होते कुशल 
_____चे नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल !

पहिल्याच भेटीत पटली जन्मोजन्मीची खूण 
____चे नाव घेते सर्वांचा मान राखून!

शुक्राची चांदणी गुप्त झाली ढगात 
______ रावांचे नाव घेऊन सांगते मी आहे सुखात !

माझ्या ___रावां चा चेहरा, आहे खूपच हसरा,
टेन्शन प्रॉब्लेम्स सगळे, एका क्षणामध्ये विसरा !

पाण्यात घागर बुडताना, आवाज येतो बुडबुड,
___आणि माझ्या Life मध्ये, नको कुणा ची लुडबुड !

Traditional Marathi Ukhane for Female | ट्रडिशनल मराठी उखाणे

बटाट्या च्या भाजी त घातला, एकदम Tasty मसाला,
___च नाव माहितेय तरी, मला विचारता कशाला ?

सकाळी पिझ्झा, दुपारी बर्गर,
___आहे, माझ्या Life चा Server !

ढीगभर चपात्या, किती पटापट लाटतेस,
___तू मला, सुपरवूमन वाटतेस !

शॉपिंग ला जायला, तयार होते मी झट्कन,
___ रावां चे नाव घेते, तुमच्यासाठी पटकन !

आशीर्वादाची फुले, वेचावीत वाकून,
___रावां चे नाव घेते, तुमचा मान राखून !

आकाशात शोभतो, इंद्रधनुष्याचा पट्टा,
___रावांचे नाव घेते, पुरे आता थट्टा !

गळ्यात मंगळसूत्र, हि सौभाग्याची खून ,
___रावांचे नाव घेते___ची सून !

उन्हाच्या उकाड्यामुळे, सगळे झाले त्रस्त,
सगळे म्हणतात___आणि___ची जोडी आहे जबरदस्त !

आकाशात रात्रीचे चमकतात, चंद्र आणि तारे,
___रावांसाठी, सोडून आले मी सारे !

Gruhapravesh Marathi Ukhane | गृहप्रवेश उखाणे

Note: रिकाम्या जागी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव टाकायचे आहे.

जमले आहेत सगळे, ____ च्या दारा त,
________ रावां चे नाव घेते, येऊ द्या ना घरात !

आमच्या दोघां चे स्वभाव, आहेत Complementary,
_______ रावांचे नाव घेऊन करते, घरा त पटकन Entry !

उंबरठ्यावरती माप देते, सुखी संसाराची चाहूल,
______ च्या जीवनात टाकले मी, आज पहिले पाऊल !

जमले आहेत सर्व आज, आमच्या लग्नाकरता दारात,
____________रावांचे नाव घेते, येऊ द्या आता घरात !

लग्ना चे फेरे आहेत 7, जन्माच्या गाठी 7 ,
________रावांचे नाव घेते, खास तुमच्यासाठी !

सोन्याचे कलश, चांदीची परात,
______ रावांचे नाव घेते, नव्या घरात !

आई बापाने वाढवले मैत्रिणीने घडवले,
________चं नाव घ्यायला _______ अडवले !

लोणावळा ला जाताना, धुके पडले दाट,
________ रावांचे नाव घेते, सोडा माझी वाट !

उंबरठयावर ठेवलेले माप, पायाच्या स्पर्शाने लवंडते,
________ रावांची पत्नी या नात्याने, गृहप्रवेश करते !

आहे मी प्रेमळ, नाही मला कोणाचा द्वेष,
_____ रावां चं नाव घेऊन, करते गृहप्रवेश !

इंद्रधनुष्यामध्ये रंग आहेत सात,
___रावांच नाव घेऊन, पाऊल टाकते आत !

सर्वांपुढे नमस्कारा साठी, जोडते दोन्ही हात,
___रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट !

प्रेमळ लोकांना आवड ते, लव्ह शायरी,
___रावां सोबत ओलांडते, मी घराची पायरी !

नागपूरची संत्री, रसरशीत आणि गोड,
___च नाव घेतो, आता तरी वाट सोड !

______ रावांचा नि माझा संसार होईल सुकर,
जेव्हा मी चिरेन भाजी आणि हे लावतील कुकर ,आता तरी माझी वाट सोड !

सुखी ठेवोत सर्वाना, ब्रम्हा, विष्णू, आणि महेश,
___रावांचे नाव घेऊन करते गृहप्रवेश !

लग्न झाले आता, आमची बहरू दे संसारवेल,
___रावांचे नाव घेते, वाजवून ___च्या घराची बेल !

___ची लेक झाली, ___ची सून,
___च नाव घेते, गृहप्रवेश करून !

नाचत नाचत वाजत-गाजत, आली आमची वरात,
___रावांचे नाव घेते, ___च्या दारात !

जमले आहेत सगळे, ___च्या दारात,
___रावां चे नाव घेते, येऊ द्या ना घरात !

Haldi Kunku Marathi Ukhane । हळदी कुंकवासाठी मराठी उखाणे

Note: रिकाम्या जागी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव टाकायचे आहे.

वडिलां ची माया आणि आईची कुशी,
______ रावांचे नाव घेते, हळदी कुंकूंच्या दिवशी !

हळदी कुंकूचे, निमंत्रण आले काल,
______ रावां चे नाव घेऊन, कुंकू लावते लाल !

दशरथ राजाने, पुत्रासाठी केला नवस,
______ रावां चे नाव घेते,
आज आहे हळदी कुंकवाचा दिवस !

श्रीकृष्ण रास खेळे, गोपिकेच्या मेळी,
______ रावां चे नाव घेते, हळदी कुंकवाच्या वेळी !

हळदी कुंकवाला जमला, सुवासिनींचा मेळ,
______ रावांचे नाव घेण्याची, हीच ती खरी वेळ !

कान भरण्यात, बायका आहेत हौशी,
______ रावांच नाव घेते, हळदी कुंकूंच्या दिवशी !

हळदी कुंकू आहे, सौभाग्याची शान,
______ रावांना आहे, सोसायटी मध्ये खूप मान !

सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र-सूर्य झाले माळी,
______ रावां चे नाव घेते, हळदी-कुंकूंच्या वेळी!

जळगाव फेमस आहे, पिकवण्या साठी केळी,
______ रावां चे नाव घेते, हळदी कुंकवाच्या वेळी !

कपाळा वर कुंकू, आणि गळ्यात मोत्याचा हार,
______ रावां चे नाव घेताना, आनंद होतो फार !

सर्वजण एकत्र जमलो, म्हणून आजचा दिवस आहे खास,
______ रावां चे नाव घेण्याची, लागली मला आस !

तुमच्या आग्रहाकरिता नाव घेते, आशिर्वाद द्यावा,
______ रावांचा सहवास, आयुष्यभर लाभावा !

Read More: Ukhane

आज आहे, श्रावणी पोळा,
______ रावांच्या जीवावर, शृंगार केले सोळा !

मोत्यांची माळ, सोन्याचा साज,
______ रावांचे नाव घेते, ______ आहे आज !

आला आला ______ चा, सण हा मोठा,
______ राव असताना, नाही आनंदाला तोटा !

Conclusion

वरील दिलेले Ukhane घेऊन तुम्ही आपल्या जोडीदारासाठी म्हणू शकता आणि आपल्या नाते वाईकांना खुश करा आणि तुमच्या आयुष्याच्या नवीन पर्वाला सुरवात करा. तुमचं पुढच्या सुंसारासाठी आमच्या टीम कडून खूप खूप शुभेच्छा……!

जर तुम्हा आणखी काही उखाणे किंवा quotes हवे असतील आम्हाला खाली कंमेंट करून नक्की कळवा. आम्ही तुमच्या कंमेंट्स ची वाट बघत आहोत.

या प्रकारच्या माहितीसाठी वेळोवेळी www.Marathiengfusion.com ला नक्की भेट द्या !

धन्यवाद ! जय हिंद ! जय महाराष्ट्र !