मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना | Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2024| संपूर्ण माहिती , पात्रता , अर्ज करण्यासाठीची तारीख

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana
Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana : हो तुम्ही खरं ऐकताय आता खरंच आली आहे लाडका भाऊ योजना म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना !!!! लाडकी बहीण योजने नंतर आता लाडका भाऊ योजना सरकारने जाहीर केली आहे.आज आपण या योजने बद्दल संपूर्ण माहिती बघुयात हे आर्टिकल वाचल्यावरती तुम्हाला दुसरी कडे कुठेही जायची गरज पडणार नाही याची खात्री आम्ही घेतो. आज आपण Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana ची सविस्तर माहिती मराठी मध्ये बघणार आहोत या मध्ये ऑनलाईन अर्ज कसा करायचा, या योजने अंतर्गत किती रक्कमेचा लाभ आपल्याला होणार आहे आणि या योजनेसाठीची पात्रता काय आहे हि सामुर्ण माहिती आम्ही देणार आहोत. या योजने ला Mukhyamantri Ladka Bhau Yojna सुद्धा म्हणतात.

Table of Contents

लाडका भाऊ योजना म्हणजेच मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने रु. ५५०० कोटी इतका निघी उपलब्ध करून दिला आहे. या योजने मध्ये युवकांना विविध उद्योजकां कडे प्रशिक्षण साठी पाठवून त्यांना इंटर्न शिप च्या मोबदल्यात रक्कम दिली जाणार आहे. थोडक्यात हि एक इंटर्नशिप योजना आहे असं म्हंटले तरी काही हरकत नाही. या मी योजने मार्फत बेरोजगार १२ वी पास/ आयटीआय/पदशवका/पदवीधर/ पदव्युत्तर या पैकी कोणीही अर्ज करू शकतो.

या योजने मध्ये युवा ना स्किल्स साठी प्रशिक्षण दिले जाईल, या प्रशिक्षण दरम्यात युवांना दार महा रु १०,०००/- देण्यात येणार आहेत. तरी या योजनेचा सर्वानी लाभ घेणे आवश्यक आहे, हि एक चांगली संधी आहे हि संधी सोडू नका.

चला तर मग आपण पुढच्या भागामध्ये या योजने बद्दल ची सविस्तर माहिती जाणून घेऊ आमच्या Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2024 या लेख मध्ये.

मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2024 या योजने अंतर्गत महाराष्ट्र सरकार कडून उद्योजकाांना त्याांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) द्वारे उपलब्ध करून देण्यात येईल. या योजने साठी भारत सरकारने एकूण Rs. 5500/- कोटी निधी मजूर केला आहे. या योजनेद्वारे, तरुणांना उद्योगांमध्ये प्रशिक्षण दिले जाईल आणि त्यांना नोकरी मिळेपर्यंत दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाईल.

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2024 ही एक स्किल्स विकास योजना आहे जी महाराष्ट्र सरकारने 27 जून 2024 रोजी 2024-25 या वर्षासाठी सादर केली आहे. हि योजना ऍडिशनल बजेट सादर करताना घोषणा केली आहे. या योजने अंतर्गत दर वर्षी ५०,००० युवांना प्रशिक्षण दिले जाईल आणि प्रक्षिक्षण संपल्यानंतर रोजगार मिळे पर्येंत दार महा १०,०००/- रुपयांचा लाभ सरकार डन मिळणार आहे.

मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना उदिष्ठ्य

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana योजने चे मुख्य उदिष्ठ्य राज्याच्या युवांना रोजगार मिळवून देण्यासाठी आणि त्यांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना आव्यश्यक ते प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करणे हे आहे. तसेच शैक्षिक पात्रता वरून युवांना वेतन मिळणार आहे.

मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना ठळक वैशिष्ठ्य

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana या योजनेचे काही ठळक वैशिष्ठ्य बघुयात.

योजनेचे नावमहाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना २०२४
सरकारमहाराष्ट्र सरकार
योजना कधी जाहीर झालीजुलै २०२४
राज्यमहाराष्ट्र
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील युवा नागरिक
मिळणारा लाभयुवांना निशुल्क प्रशिक्षण आणि दर महा १०,०००/- पर्येंत आर्थिक मदत
ऑफिसिअल वेबसाईटमहाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना GR खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून भागू शकता.

1. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या संकेत स्थळावरती बारावी, आय.टी.आय., पदविका , पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोांदणी करू शकतील.

2. विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प , उद्योग /स्टार्टअप्स , विविध आस्थापना इत्यादी याना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी ऑनलाईन नोंदवता येतील

3. सुमारे १० लाख करी प्रशिक्षण (इंटर्नशिप) च्या संधी प्रत्त्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहेत

4. सादर कार्य प्रशिक्षण ( इंटर्नशिप ) चा कालावधी हा ५ महिने ठेवण्यात आला आहे व या कालावधीसाठी उमेदवारांना या सरकार मार्फत विद्यावेतन देण्यात येणार आहे

5. सादर विद्यावेतन लाभार्थ्यांच्या थेट बँक अकाउंट मध्ये जमा कण्यात येईल.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण वेबसाइट - येथे पहा

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana Eligibility Criteria

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana साठी मुख्य पात्रता अशी आहे कि तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजे. या योजने बद्दलची शैक्षिक पात्रता आपण पुढे बघुयात.

1. या योजने चा लाभ घेण्यासाठी उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असायला पाहिजे.

2. उमेदवाराचे किमान वय १८ आणि कमाल वय हे ३५ वर्ष असले पाहिजे

3. उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता १२ वी पास/ आयटीआय/पदविका/पदवीधर/ पदव्युत्तर असावी.

4. अर्ज बँक अकाऊंट आधार कार्ड शी लिंक केलेले असले पाहिजे.

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana Eligibility for Industries & Establishments

मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना आस्थापना आणि उद्योजकांसाठी पात्रता

1. आस्थापना आणि उद्योग हा महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा.
2. आस्थापना आणि उद्योजकाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी.
3. आस्थापना आणि उद्योगाची स्थापना किमान ३ वर्ष पूर्वीची असावी.
4. आस्थापना आणि उद्योगांनी EPF, ESIC, GST, Certificate of Incorporation, DPIT आणि उद्योग आधाराची नोंदणी केलेली असावी.

उद्योगांनी आणि उद्योजकांनी या महास्वयम (Mahaswayam) website वर नोंदणी करायची आहे

Apply Here :- महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना विद्यावेतन

शैक्षणिक पात्रता नुसार विद्यावेतन चे विवरण खाली दिल्या प्रमाने असणार आहे.

शैक्षणिक पात्रताप्रति माह विद्यावेतन रु.
१२ वी पासरु. ६०००/-
आय. टी. आय. /पदविकारु. ८०००/-
पदवीधर / पदव्युत्तररु. १००००/-

मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना आव्यश्यक डोकमेंट्स

1. आधार कार्ड
2. शाळेचे प्रमाण पत्र
3. पासपोर्ट साइज फोटो
4. महाराष्ट्र राज्य निवासी प्रमाण पत्र
5. बँकेचे पास बुक
6. ओळख पत्र
7. मोबाइल नंबर आणि बाकी आव्यश्यक डोकमेंट्स

मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना 2024 Apply Online

मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना साठीची ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सरकार ने जाहीर केली नाही आहे पण आम्ही खाली दिलेल्या स्टेप्स मधून आपण अर्ज करू शकता. सरकारकडून या प्रक्रिये वर उपडते येईल आम्ही त्यावेळी तुम्हाला या बद्दल उपडते नक्कीच देऊ. उपडते त्वरित मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेल ला फोल्लोव करा
टेलिग्राम चॅनेल लिंक- Marathi-Eng Forum

स्टेप 1 – मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेच्या ऑफिसिअल संकेत स्थळावर जाणे

स्टेप 2- संकेतस्थळ वरील मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना साठी ऑनलाईन apply करण्यासाठीचे option मिळेल त्या वरती क्लिक करा

स्टेप 3- या नंतर आपल्यासमोर योजनेमध्ये अर्ज करण्यासाठीचा फॉर्म ओपन होईल

स्टेप 4- या फॉर्म मध्ये आपण आपली माहिती अचूक भरणे गरजेचे आहे, आपली माहिती तपासून भरा

स्टेप 5- फॉर्म मध्ये आव्यश्यक माहिती भरून झाल्यानंतर त्यासाठी लागणारे आव्यश्यक डोकमेंट्स सुद्धा अपलोड करा

स्टेप 6 – सर्व माहिती भरून झाल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा.

या प्रकारे आपण मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना मध्ये Apply करू शकता.

Read Also – Amazon Work from Home jobs for Females

मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना विचारले जाणारे प्रश्न

लाडका भाऊ योजना काय आहे ?

लाडका भाऊ योजना म्हणजेच मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना आहे, हि एक रोजगार आणि विद्यावेतन ची योजना आहे

मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना ची ऑफिसिअल वेबसाईट कोणती आहे?

मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना ची ऑफिसिअल वेबसाईट rojgar.mahaswayam.gov.in हि आहे

मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना साठी apply कसे करायचे?

मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना साठी apply त्यांच्या ऑफिसिअल website वरती फॉर्म भरून करायचे आहे

मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना साठी उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता १२ वी पास/ आयटीआय/पदविका/पदवीधर/ पदव्युत्तर असावी.

मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना मध्ये किती विद्यावेतन मिळणार आहे?

मध्ये शैक्षणिक पात्रतेनुसार दरमहा रु. ५,०००/- पासून रु. १०,०००/- विद्यावेतन मिळणार आहे

मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनामध्ये इंटर्नशिप चा कालावधी किती असणार आहे?

मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनामध्ये इंटर्नशिप चा कालावधी ६ महिने इतका असणार आहे