गॅस फ्री मिळणार| उज्वला गॅस योजना 2.0| PM Ujjwala Yojana 2024 Marathi

PM Ujjwala Yojana 2024
PM Ujjwala Yojana 2024

PM Ujjwala Yojana 2024 : आता मिळणार फ्री गॅस!! प्रधान मंत्री नरेंद्र मोदी घेऊन आले आहेत PM उज्ज्वला योजना २.०. हि योजना नक्की काय आहे? या योजने साठी नक्की कोण कोण पात्र आहे? आणि या योजने चा लाभ कसा घ्यायचा? या बबद्दल ची सविस्तर माहिती आपण या पोस्ट मध्ये घेऊन आलो आहोत खास तुमच्या साठी. तरी पोस्ट शेवटपर्येंत वाचा आणि आपल्या मित्रांसोबत आणि गरजू लोकांपर्येंत पोहचवा शेअर करून.

देशातील गरीब महिलांसाठी सरकार केंद्र सरकार नेहमी कँटीन कोणती योजना आणत असते. यातीलच एक योजना म्हणजे PM Ujjwala Yojana 2024 हि आहे. या योजनेच्या माध्यमातून क्रेंद्र सरकार द्वारे ग्रामीण क्षेत्रातील गरीब कुटूंबियांना आणि एलपीजी कार्ड धारक महिलांना मोफत गॅस कनेक्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी घोषणा केली आहे कि , केंद्र सरकार प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २.० Pradhanmantri Ujjwala Yojana 2.0 अंतर्गत देशातील महिलांना ७५ लाख नवीन मोफत गॅस कनेक्शन देणार आहे,  हे कनेक्शन तीन वर्षात म्हणजेच २०२६ पर्यंत देण्यात येणार आहेत. यासाठी सरकारने सरकारी तेल कंपन्यांना तब्बल १६५० कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. या मुले गरीब महिलांची आता चुली पासून सुटका होणार आहे शिवाय पपर्यावरणाला सुद्धा याचा फायदा होणार आहे. गरीब महिलांना चुलीच्या धुरा मुले खूप कठीण परिस्थिती मध्ये स्वयंपाक करावा लागायचा या साठी हि योजना खूप लाभदायी आहे.

PM सूर्य घर योजना संबंधित माहिती साठी आमचा सूर्य घर योजना हा लेख नक्की वाचा

PM Ujjwala Yojana 2024 म्हणजे काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी द्वारे स्वच्छ इंधन चांगले जीवन या घोषणा द्वारे हि प्रधान मंत्री उज्ज्वला योजना २०१६ मध्ये सुरु करण्यात आली होती. PM Ujjwala Yojana 2024 च्या माध्यमाने देशातील गगरीब महिलांना LPG गॅस connection मोफत दिले जाते आणि त्यासोबतच पहिले रिफिलिंग सुद्धा मोफत दिले जाते. या सोबतच या योजने अंतर्गत गॅस शेगडी सुद्धा मोफत दिली जाते. PM Ujjwala Yojana 2024 च्या अंतर्गत आता पर्येंत १० कोटी इतके फ्री connection सरकारने दिले आहेत. या योजने मध्ये १ जानेवारी २०२४ पासून महिलांना गॅस सिलेंडर ४५० रुपया मध्ये मिळत आहे.

२०२२ मध्ये गरीब कुटुंबांना ०८ कोटी LPG कनेक्शन देण्याचे योजले होते. केंद्र सरकार मार्फत ७ सप्टेंबर २०१९ रोजी, महाराष्ट्रामधील औरंगाबाद मध्ये ८ कोटी एवढे LPG कनेक्शन देण्यात आले आहेत.

Pradhan Mantri Ujjwala Yojana In Marathi

या योजने अंतर्गत पात्र कुटुंबांना एका वर्षात एकूण १२ गॅस सिलेंडरचा लाभ घेता येणार आहे. म्हणजे बाराशे गॅस सिलेंडर तुम्हाला साडेचारशे रुपये प्रति सिलेंडर या किमतीत मिळणार आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना हि गरीब कुटुंबातील महिलांना मोफत गॅस कनेक्शन देऊन स्वस्तात गॅस सिलेंडर उपलब्ध करून देत आहे.

योजनेचे नावपीएम उज्ज्वला योजना
कोणाद्वारे सुरु करण्यात आलीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या द्वारे सुरु करण्यात आली
कधी सुरु करण्यात आली०१ मे २०१६
योजनेचा उद्देशदेशातील गरीब नागरिकांना मोफत गॅस कनेक्शन देणे
लाभार्थीं कोणदेशातील महिला
श्रेणीकेंद्र सरकार योजना
संबंधित मंत्रालयपेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
अर्ज करण्याची प्रक्रियाया योजनेसाठी Online पद्धतीने अर्ज करू शकता.
अधिकृत वेबसाईटhttps://www.pmuy.gov.in

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे उद्दिष्ट

PM Ujjwala Yojana हि सुरु करण्या मग्न मुख्य उद्दिष्ट हे आहे कि स्वयंपाक घर धूर मुक्त करणे. तसेच स्वच्छ इंधन आणि जंगले जीवन या घोषणेची अमलबजावणी करणे. जेणेकरून महिलांच्या सक्षमीकरणालाही चालना देता येईल. तसेच या योजनेमुळे गरीब कुटुंबातील महिलांना LPG गॅस सिलिंडर मिळेल. आत्तापर्यंतच्या सर्व योजनांपैकी ही योजना केंद्र सरकारची सगळ्यात जास्त यशस्वी झालेली आहे.

प्रधानमंत्री उज्वला योजना Pradhanmantri Ujjwala Yojana ही केंद्र सरकार ने आणलेली योजना आहे.

देशभरातील ग्रामीण भागात राहणाऱ्या गरीब महिलांच्या इंधन समस्या लक्षात घेऊन प्रधानमंत्री उज्वला योजना  सुरू करण्यात आली आहे

PM Ujjwala Yojana योजनेअंतर्गत  जे गॅस कनेक्शन देणार आहे ते कुटुंबातील महिलेच्या नावावर असेल

देशभरातील तब्बल १० कोटी कुटुंबांना एलपीजी गॅस कनेक्शन देण्याचे लक्ष प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत २०२३-२४ चा बजेट मध्ये केले आहे.

प्रधानमंत्री उज्वला योजनेमुळे  ग्रामीण भागात असणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बळ कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

PM Ujjwala Yojana योजनेसाठी पात्रता

१. अनुसूचित जातीमधील कुटुंब

२. अनुसूचित जनजातीमधील कुटुंब

३. सर्वाधिक मागासवर्गीय

४. चहा आणि माजी चहा मळा जमाती

५. वनवासी

६. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण)

७. बेटांवरील व नदी बेटांवरील रहिवासी

८. १४ कलमी घोषणेनुसार गरीब कुटुंबे

९. अर्जदाराचे कमीत कमी वय १८ वर्षे असणे आवश्यक आहे.

१०. एकाच घरात इतर कोणतेही LPG कनेक्शन असू नये.

११. त्याच घरामध्ये कोणालाही OMC तर्फे कोणतेही LPG कनेक्शन मिळालेले नसावे.

वरील पैकी कोणत्याही वर्गात बसणाऱ्या प्रौढ महिला या योजने साठी पात्र आहेत.

PM Ujjwala Yojana 2024 चे फायदे

या योजने अंतर्गत LPG गॅस कनेक्शन साठी केंद्र सरकार कडून रोख मदत करण्यात येणार आहे. (5 Kg सिलेंडर साठी 1150/- रु. आणि 14.2 Kg सिलेंडर साठी 1600/- रु.)

सिलेंडरसाठी सुरक्षा ठेव म्हणून – 5 किलो सिलेंडरसाठी 800/- रु. आणि 14.2 किलो सिलेंडरसाठी 1250/- रु. इतकी रक्कम ठेऊन घेण्यात येईल LPG नळी : 100 रु.

प्रेशर रेग्युलेटर : 150 रु.

घरगुती गॅस ग्राहक कार्ड : 25 रु.

गॅस कनेक्शनची तपासणी / मांडणी/ प्रात्यक्षिक शुल्क : 75 रु.

या सोबतच , या योजने मध्ये लाभार्थ्यांना ओएमसी कडून पहिले LPG रिफील आणि स्टोव्ह हे दोन्ही मोफत देण्यात येणार आहे.

PM Ujjwala Yojana 2024 साठी लागणारी कागदपत्रे

१. अर्जदाराचे आधारकार्ड (आसाम व मेघालय या राज्यांमध्ये आधार कार्ड सक्तीचे नाही, त्याऐवजी रेशन कार्ड असेल तरी चालेल)

२. अर्जदाराचा ओळखपत्राचा दाखला

३. पत्त्याचा दाखला

४. रेशन कार्ड किंवा स्थलांतरित कुटुंबासाठी स्वघोषणापत्र असणे आवश्यक आहे.

५. अर्जदाराच्या स्वाक्षरीसोबत १४ मुद्द्यांचे विहित नमुन्यामधील स्व-घोषणापत्र असणे आवश्यक आहे.

६. अर्जदाराकडून ओएमसी पोर्टलवर सादर करण्यात येणारे दस्तऐवज.

७. ग्राहकाच्या गॅस वापरण्याच्या ठिकाणी जोडणी-पूर्व अहवाल म्हणजेच फ्री इन्स्टॉलेशन चे चेक रिपोर्ट.

PM Ujjwala Yojana 2024 Online Apply

PM Ujjwala Yojana 2024 साठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे अर्ज करता येते. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महिला आपल्या जवळच्या सीएससी केंद्र वरती जाऊन अर्ज करू शकतात आणि ऑफलाईन अर्ज करण्यासाठी थेट वीरकाकडे जाऊन अर्ज जमा करू शकता.

ऑफलाईन अर्ज कसे करावे । अर्ज प्रक्रिया

या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया अद्याप सुरु झालेली आहे. पण तुम्ही ऑफलाईन सुद्धा अर्ज करू शकता.

या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज मिळवण्यासाठी तुमच्या जवळच्या गॅस वितरकाला भेट द्यावी लागेल किंवा Ujjwala Gas Yojana Marathi च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा अर्ज डाउनलोड करू शकता.

१. अर्ज डाउनलोड करण्यासाठी सर्वात पहिला तुम्हाला अधिकृत वेब्सिते वर जावे लागेल  

अधिकृत वेबसाइट – www.pmuy.gov.in 

२. वेबसाईट ओपन केल्यानंतर वेबसाईटचे होम पेज ओपन होईल.

३. तुम्हाला या पेज वर डाउनलोड फॉर्म हा पर्याय दिसेल, तुम्हाला डाउनलोड वर क्लिक करायचे आहे.

४. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अर्ज ओपन होईल. त्यानंतर त्याची प्रिंट काढायची आहे.

५. प्रिंट काढल्यानंतर अर्ज काळजीपूर्वक वाचून आवश्यक ती माहिती नीट भरून घ्यायची आहे. अर्ज भरून झाल्यानंतर अर्जासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रति जोडायच्या आहेत.

६. त्यानंतर तुमच्या जवळील गॅस वितरकाकडे जाऊन सर्व कागदपत्र जमा करायची आहे.

अशा प्रकारे उज्ज्वला गॅस योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्जाची पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला मोफत LPG गॅस कनेक्शन मिळेल.

ऑनलाईन अर्ज कसे करावे । अर्ज प्रक्रिया

१. अर्ज डाउनलोड करण्यासाठी सर्वात पहिला तुम्हाला अधिकृत वेब्सिते वर जावे लागेल  

अधिकृत वेबसाइट – www.pmuy.gov.in 

२. वेबसाईट ओपन केल्यानंतर वेबसाईटचे होम पेज ओपन होईल.

३. तुम्हाला apply for new ujjwala 2.0 connection या लिंक वर क्लिक करावे लागेल.

४. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुम्हाला तीन पर्याय दिसतील इंडियन गॅस, भारत गॅस आणि एचपी गॅस यापैकी तुम्हाला कोणताही एक पर्याय निवडून त्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

५. या पेजवर तुम्हाला उज्वला लाभार्थी कनेक्शन या पर्यावर क्लिक करावे लागेल.

६. त्यानंतर तुमच्या जिल्ह्याची निवड करावी लागेल.

७. प्रधानमंत्री उज्वला योजना ई-केवायसी अर्ज पाहायला मिळेल या मध्ये संपूर्ण माहिती तपासून भरावी लागेल.

८. तुमचा आधार कार्ड नंबर आणि तुमचा मोबाइल नंबर आधार कार्ड ला लिंक असलेला तो आणि कॅप्चा टाकावा लागेल.

९. तुमच्या मोबाइल एक ओटीपी येईल तो तिथे टाकावा लागेल. नंतर तुम्हाला फॉर्म मध्ये तुमचे नाव, पत्ता, रेशन कार्ड तपशील, बँक खात्याची माहिती इत्यादी संपूर्ण माहिती भरावी लागेल.

१०. तुम्हाला किती किलो वजनाचा एलपीजी गॅस सिलेंडर हवा आहे त्याची निवड करावी लागेल.

११. सबमीट बटन वर क्लिक करावे लागेल.

Pradhanmantri Ujjwala Yojana मध्ये अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक नंबर मिळेल तो नंबर तुमच्याजवळ जपून ठेवणे आवश्यक आहे. 

अशा प्रकारे उज्ज्वला गॅस योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्जाची पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला मोफत LPG गॅस कनेक्शन मिळेल.

Conclusion

PM Ujjwala Yojana 2024 बद्दल या लेख मध्ये आम्ही संपूर्ण माहिती दिली आहे. हि माहिती वाचून पात्रता निकष तपासून पहा , जर तुम्ही या पत्रात मध्ये बसत असाल तर आम्ही दिलेल्या अर्ज प्रक्रिया मध्ये दिलेल्या स्टेप्स वापरून अर्ज करू शकता. या योजनेचा लाभ सर्व महिलेनी घेतला पाहिजे जेणेकरून या योजनेचे स्वच्छ इंधन चांगले जीवन हि घोषणा पूर्ण होईल शिवाय पर्यावरणाची हि हानी नाही होणार. महिलेचे आरोग्य सुद्धा संकटात नाही येणार. चुलीच्या धुरा मुले महिलांना दमा या रोगाची दात शक्यता असते.

हा लेख कसा वाटलं हे नक्की कळवा. परत भेटू नवीन योजनेसोबत तोपर्येंत जय हिंद!! जय महाराष्ट्र !!!

PM Ujjwala Yojana 2024 FAQ

प्रधानमंत्री उज्ज्वला  योजनाची सुरुवात कधी झाली?

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा सुरवात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ मध्ये केला.

उज्ज्वला योजनेचा लाभ कोणाला मिळतो?

प्रधानमंत्री उज्ज्वला  योजनेचा लाभ देशातील गरीब आणि मध्यम उत्पन्न असलेल्या महिलांना लाभ दिला जातो.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत अर्ज कसा करावा?

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत ऑनलाइन तसेच ऑफलाईन प्रक्रियेद्वारे देखील तुम्ही अर्ज करू शकता. ऑफलाईनसाठी तुम्हाला जवळच्या गॅस एजन्सीवर जाऊनही अर्ज करता येतो. तर ऑनलाइन साठी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.