
Ramai Awas Gharkul Yojana 2024:आपल्या महाराष्ट्र राज्य मध्ये अनेक नागरिक अशे आहेत ज्यांच्या कडे आपले स्वतःचे पक्के घर नाही आहे. कारण त्याच्या आर्थिक परिस्थिती मुळे त्यांना स्वतःचे घराचे सुख मिळालें नाही .म्हणूनच महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती, आर्थिक दुष्टया गरीब नागरिकांना सरकारकडून घर मिळवून देण्यासाठी रमाई आवास घरकुल योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत सरकार आर्थिक दुष्ट्या गरीब नागरिकांना पक्के घर उपलब्ध करून देणार आहे. आणि या योजना मध्ये अर्ज तुम्ही ऑनलाईन सुद्धा करू शकता त्यामुळे या योजनेचा लाभ जास्त लोकांना घेता येईल.
तुम्ही जर महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल आणि आपल्या कडे राहण्यासाठी आपले घर नाही आहे तर हि योजना फक्त तुमच्या साठीच आहे. या योजने साठी तुम्ही अर्ज करा करू शकता आणि या योजने ला कोण पात्र आहेत. या योजने साठी सर्ज कसा करायचा या संबंधित सर्व माहिती आम्ही या ब्लॉग मध्ये देणार आहोत.
रमाई आवास घरकुल योजना २०२४।ramai awas Gharkul yojana 2024
रमाई आवास घरकुल योजना हि प्रामुख्याने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जण जाती व नवं बौद्ध यांच्या साठी साल २००९ आणि २०१० साली सुरु करण्यात आली. या योने अंतर्गत २६९ चौरस मीटर चे स्वतःचे हक्काचे पक्के घर बांधण्यासाठी महाराष्ट्र सरकार मदत करत आहे. रमाई आवास योजना किंवा घरकुल योजना हि एक महाराष्ट्र राज्य कडून राबवण्यात येणारी महत्वाची योजना आहे. या योजने मुळे महाराष्ट्र मधील ५१ लाख नागरिकांना पक्के घर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यात राहणारे अनुसूचित जाती आणि जमाती किंवा आर्थिक दृष्टया गरीब नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येईल. आतापर्येंत या योजने अंतर्गत १५०००० घरे महाराष्ट्र च्या नागरिकांना देण्यात आलेली आहेत.
जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल तर आपल्याला ह्या योजने अंतर्गत पक्के घर मोफत मिळू शकते. या योजने साठी अर्ज कसा करायचा ? आणि या योजनेचं लाभ कुणाला मिळणार आहे ? अर्ज कुठे करायचा? या साठी हा लेख पूर्ण वाचा.
केंद्र सरकारची सूर्य घर येजना चा लाभ देखील नागरिक घेऊ शकतात या योजना साठी सर्ज कसा करायचा या साठी PM सूर्य घर योजना येथे वाचा
Ramai Awas Gharkul Yojana
योजना चे नाव | रमाई आवास योजना 2024 |
साल | 2024 |
राज्य चे नाव | महाराष्ट्र |
लाभार्थी | अनुसूचित जाति आणि अनुसूचित जण जाति वर्गाचे नागरिक |
लाभ | निशुल्क घर |
उद्देश्य | गरीब परिवारांना घर उपलब्ध करन देणे |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
अधिकृत वेबसाइट | https://rdd.maharashtra.gov.in |
ramai awas Gharkul yojana 2024 योजनेचे उद्दिष्ट
Ramai Awas Gharkul Yojana 2024 चा मुख्य उद्देश आहे कि आर्थिक दृष्टया गरीब आणि अनुसूचित जाती किंवा माध्यम वर्गीय नागरिकांना पिके घर मोफत उपलब्ध करून देणे असे आहे. आर्थिक स्थिती वेताची असल्या मुले जे नागरिक स्वतःचे घर बंधू शकत नाहीत म्हणून महाराष्ट्र सरकारने हि योजना जाहीर केली आहे. महाराष्ट्र सरकार ताफे या योजने अंतर्गत एकूण ५१ लाख नागरिकांना पक्के घर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आतापर्येंत या योजने चा लाभ एकूण १.५ लाख नागरिकांना मिळाला आहे.
या योजने मध्ये कच्च्या घरामध्ये राहणारी , झोपडी मध्ये राहणारे अशा अनेक गरीब नागरिकांना या योजनेच्या लाभ च्या रूपात पक्के घर मोफत मिळवून देणार आहे. या योजने साठी नागरिक हा महाराष्ट्र राज्य मध्ये गेल्या १५ वर्ष पासून रहिवासी असला पाहिजे आणि एका कुतुबातुन एकालाच हा लाभ घेता येणार आहे. आणि महत्वाचे म्हणजे लाभार्थी च्या नवे कोणतेही घर नसावे. प्रमुख्याने रमाई घालकूल योजना हि ३ वादामध्ये विभागली गेली आहे. ज्या त नगर पालिका /महानगरपालिका , ग्रामीण आणि महानगरपालिका प्रघाणीकरण क्षेत्र. हि योजना साठी अनुदान समाज कल्याण अधिकारी यांच्या मदतीने दिली जाणार आहे.
रमाई आवास योजना हि विधवा महिलांन साठी देखील आहे. या योजने मध्ये तुम्ही ज्या क्रमाने अर्ज केला आहे त्या क्रमाने तुम्हाला घर बांधण्यासाठी मदत दिले जाते. या योजने अंतर्गत सर्वसाधारण क्षेत्रांमध्ये जर तुम्ही तुमचे घर बांधत असाल तर तुम्हाला १,३२,०००/- इतके अनुदान मिळू शकते. या योजने सांतर्गत जर तुमचे घर श्री विभागात असेल तर तुम्हाला २,५०,०००/- इतके अनुदान दिले जाते. तसेच जर तुमचे घर डोंगरी बघत असेल तर १,४२,०००/- इतके अनुदान मिळते. महाराष्ट्र सरकारद्वारे नागरिकांना घर बांधण्यासाठी अनुदानाच्या स्वरूपात मदत केली जाते.
- रमाई घरकुल आवास योजनेचे उद्दिष्ट आहे की जे दुसऱ्यांच्या घरात राहतात किंवा झोपडींमध्ये राहतात त्यांना हक्काचे पक्के घरे सरकारद्वारे दिली जावीत व त्यांना या योजनेद्वारे आर्थिक मदत मिळावी
- रमाई घरकुल आवास योजना द्वारे महाराष्ट्रातील अनुसूचित जाती अनुसूचित जण जाती आणि नव बौद्ध यांना पक्के घर मिळावे यासाठी ही योजना महाराष्ट्र सरकारतर्फे सुरु करण्यात आली.
- रमाई घरकुल आवास योजनेद्वारे महाराष्ट्र मध्ये कोणीही बेघर राहू नये सर्वांना आपली हक्काची घरे मिळावी हा आहे.
- महाराष्ट्रात खूप लोक झोपडपट्टीत राहतात या योजनेअंतर्गत झोपडपट्टी मुक्त महाराष्ट्र बनवणे हे हि सरकारचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
ramai awas Gharkul yojana 2024
जिल्हा | ग्रामीण विभाग | शहरी विभाग |
नागपुर | 11677 | 2987 |
औरंगाबाद | 30116 | 7565 |
लातूर | 24274 | 2770 |
अमरावती | 21978 | 3210 |
नाशिक | 14864 | 346 |
पुणे | 8720 | 5792 |
मुंबई | 1942 | 86 |
ramai awas Gharkul yojana 2024 पात्रता
१. अर्जदार हा अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती व नवबौद्ध वर्गातील असावा.
२. लाभार्थी हा कमीत-कमी १५ वर्षपासून महाराष्ट्रात वास्तव्यास असला पाहिजे.
३. अर्जदाराच्या कुटुंबांची वार्षिक उत्पन खालील प्रमाणे असणे आवश्यक आहे.
ग्रामीण विभाग | नगरपरिषद विभाग | महानगरपालिका विभाग | मुंबई महानगर प्रदेश विभाग |
रु.१.२० लाख | रु.१.५० लाख | रु.२.००० लाख | रु.३.०० लाख |
४. अर्जदाराने याअगोदर शासनाच्या अन्य गृह योजना जसे कि म्हाडातर्फे, मा.मुख्यमंत्री स्वेच्छा निर्णय नुसार वितरीत झालेली सदनिका, आणि वाल्कीकी आंबेडकर आवास योजना लोक आवास अशा कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
५. नागरी कमाल जमीन धारणा अधिनीयामांतर्गत शासनाकडून प्राप्त होणार्या ५% घरामधून कोणत्याही नागरी समूहात घर वितरीत झाल्यास व असा लाभार्थी योजनेंतर्गत पात्रतेच्या अटी पूर्ण करीत असल्यास त्यास या योजनेअंतर्गत अनुदान मिळण्यासाठी पात्र मान्य केले जाईल.
६. अर्जदाराचे कुठेही स्वच्छच्या नावावर पक्के घर नसावे.
ramai awas Gharkul yojana 2024 आवश्यक कागदपत्रे
१. ७/१२ उतारा, ८-अ उतारा, मालमत्ता नोंदणीपत्र आणि ग्रामपंचायत मालमत्ता नोंदवहीतील उतारापैकी एक उतारा असणे आवश्यक आहे.
२. घरपट्टी, पाणीपट्टी, विद्युत बिल या पैकी एक पावती असणे आवश्यक आहे.
३. जात प्रमाणपत्र(Cast Certificate)
४. उत्पनाचा दाखला(Income Certificate)
५. निवडणूक मतदार ओळखपत्र
६. रेशन कार्ड
७. सरपंच/तलाठ्याचा दाखला
८. महानगरपालिका/नगरपालिका मालमत्ता कर भरल्याच्या पावतीची प्रत
९. लाभार्थी विधवा असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र
१०. घर बांधायचे असल्यास जर त्यात कोणी हिस्सेदार असेल तर त्याची संमती पत्र
११ जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला
१२. लाभार्थीने शासनाकडून घर बांधण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या योजनेचा लाभ घेतला नाही अशी हमीपत्र
१३. लाभार्थी जर पूरग्रस्त असेल तर पूरग्रस्त असल्याचा दाखला
१४. जातीय हिंसेत जर लाभार्थी पीडित असेल तर त्याचा दाखला
१५. लाभार्थी पंधरा वर्षापासून महाराष्ट्राचा रहिवासी आहे. असा रहिवासी दाखला
१६. प्रतिज्ञापत्र
१७. लाभार्थ्याचे कोणतेही राष्ट्रकृत बँकेमध्ये पती पत्नीचे जॉईंट अकाउंट असणे आवश्यक.
१८. या व्यतिरिक्त आधार कार्ड , पॅन कार्ड , पासपोर्ट साईज फोटो, टॅक्स पावती , मूल्यांकन पावती
ramai awas Gharkul yojana 2024 Apply Online
Ramai Awas Gharkul Yojana 2024 साठी आपण ऑफलाईन किंवा ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया:-
१. अधिकृत संकेत स्थळावरती भेट द्या.
२. होम पेज वरती रमाई घरकुल आवास योजना असा पर्याय दिसेल त्यावर क्लीक करा.
३. त्यानंतर आपल्या समोर एक फॉर्म ओपन होईल, त्या फॉर्म मध्ये आवश्यक ती सर्व माहिती भरा.
४. त्यानंतर तुमचे username आणि पासवर्ड क्रिएट होईल
५. हे username आणि पासवर्ड वापरून लॉगिन करायचे आहे आणि फॉर्म भरून सर्व आवश्यक कागदपत्रे उपलोड करायचे आहेत.
ऑफलाईन फॉर्म भरण्यासाठीही प्रक्रिया खालील प्रमाणे आहे;-
आपण ज्या बागेत राहता त्या भागातील ग्राम पंचायत परिसरात असेल तर ग्रामपंचायत किंवा नगर पालिका किंवा महानगर पालिका मध्ये तुम्हाला अर्ज फॉर्म मिळेल तो भरून तिचे सबमिट करावा.
ramai awas Gharkul yojana 2024 List
Ramai Awas Gharkul Yojana 2024 अर्ज सबमिट केल्यावरती सरकारकडून लिस्ट बनविण्यात येते त्या लिस्ट नुसार आपलयाला या योजनेचा लाभ मिळणार आणि तुम्ही या लाभ साठी पात्र असाल. हि लिस्ट पाहण्यासाठी अगदी सोपी पद्धत आहे. हि लिस्ट तुम्ही ऑनलाईन सुद्धा पाहू शकता.
१. सर्वप्रथम अर्जदाराने अधिकृत संकेतस्थळ ला भेट द्यावे.
२. होम पेग वर आपल्याला रमाई आवास योजने ची लिस्ट चा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा
३. आपली ओळख करण्यासाठी तुमचा मोबाइलला नंबर आणि अर्जाचा नंबर विचारले जाईल ते व्हेरिफाय करून झाल्या नंतर तुमच्या समोर लिस्ट ओपन होईल.
रमाई आवास घरकुल योजनेसाठीचे अनुदान कसे मिळेल?
रमाई आवास योजनेचे अनुदान ३ हफ्त्यात मिळेल. या चे सविस्तर माहिती खाली दिली आहे:
पहिला हप्ता :- 50% टक्के इतके अनुदान घराचे बांधकाम सुरू करण्याच्या वेळी अर्जदाराच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.
दुसरा हप्ता:-पहिला हप्ता मिळाल्यानंतर 50% टक्के निधी बांधकाम करण्यासाठी वापरला आहे हे हे दर्शवणारी प्रमाणपत्र सादर केल्यानंतर 40% अनुदान अर्जदाराच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.
तिसरा हप्ता:- लाभार्थीचे घर पूर्ण झाल्यानंतर अधिकारी येऊन तपासणी करतात त्या तपासणीमध्ये एक दाखला दिला जातो तो दाखला जमा केल्यानंतर उर्वरित १०% टक्के अनुदान अर्जदाराच्या बँक खात्यात जमा केले जाते.
Conclusion
आपला देश अजून हि दारिद्य रेषे खालील म्हणून ओळखला जातो कारण आपल्या देशातील अनेक नागरिक अजून सुद्धा रस्त्याच्या कडेला झोपडी मध्ये राहतात आणि काही लोक भाड्याने राहतात त्यांच्या कडे स्वतःचा घर बांधण्यासाठी आर्थिक स्थिती नाही आहे. या साठीच झोपडीमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने Ramai Awas Gharkul Yojana 2024 हि आणली आहे. या योजने मुळे शहरी भागात भाड्याने राहणारे नागरिक सुद्धा लाभ घेऊ शकतात या बद्दल च्या अति आणि पात्राता आपण या लेख यामध्ये बघितली आहे.
आम्ही आशा करतो कि या योजनेची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल आहे. या बद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की कालवा कॉमेंट करून . जय हिंद!! जय महाराष्ट्र !!!!
ramai awas Gharkul yojana 2024 FAQ
रमाई आवास घरकुल योजनेसाठी किती चौरस फुट जागा आवश्यक आहे?
२६९ चौरस फुट जागा बांधण्यासाठी अनुदान किंवा आर्थिक सहाय्य हे महाराष्ट्र सरकार करेल.पण आपल्याला आपल्या मर्जीनुसार बांधकाम करायचे असेल तर तो खर्च आपल्याला स्वतः करावा लागेल.
रमाई आवास घरकुल योजना हि कोणासाठी आहे ?
घरकुल योजना प्रामुख्याने अनुसूचित जाती अनुसूचित जमाती वन व बौद्ध यांच्यासाठी
महाराष्ट्र शासनाचा कोणता विभाग हि योजना राबवत आहे ?
ग्रामविकास व गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र शासन.
रमाई आवास घरकुल योजनेसाठीचे अनुदान कसे मिळेल?
रमाई आवास योजनेचे अनुदान ३ हफ्त्यात मिळेल.