RBI Grade B Recruitment 2024 : नमस्कार मंडळी, आरबीआय ऑफिसर ग्रेड बी भरती 2024 बद्दल एक महत्त्वपूर्ण सरकारी नोकरीची माहिती घेऊन आलो आहे. रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने ऑफिसर ग्रेड बी पदासाठी रिक्त जागांची घोषणा केली आहे. ही ग्रुप ए (Group A) पोस्ट आहे आणि संपूर्ण भारतात ही भरती होणार आहे. या लेखात आपण या रिक्त जागांबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत, ज्यामध्ये निवड प्रक्रिया, पात्रता निकष, परीक्षा पॅटर्न, अभ्यासक्रम, महत्त्वाच्या तारखा आणि बरेच काही समाविष्ट आहे. हा लेख वाचल्या नंतर तुम्हाला दुसरा कोणताही लेख वाचायची गरज नाही पडणार याची खात्री मी घेतो. चला तर मग सुरु करूया
RBI Grade B Exam Highlights | |
---|---|
Exam Name | RBI Grade B |
Post | Grade B (DR) for General, DEPR, DSIM Streams |
Organisation Name | Reserve Bank of India (RBI) |
Exam Type | Online Exam |
Application Fees | General/ OBC/ EWS – Rs. 1000/- SC/ST/PWD – Rs 175/- |
Selection Process | Phase 1: Prelims Phase 2: Mains Phase 3: Interview |
Job Location | All India |
Category | Government Job |
RBI Website | www.rbi.org.in |
तसेच RRB JE Recruitment 2024 च्या बद्दल माहिती साथची सुद्धा आपण या वेब्सिते ला भेट देऊ शकता.
महत्त्वाच्या तारखा
RBI Grade B Recruitment 2024 अर्ज करण्यासाठीची तारीख 25 जुलै 2024 पासून 16 ऑगस्ट 2024 पर्येंत आहे. या तारखा मधेच RBI Grade B 2024 साठी रेजिस्ट्रेशन करता येणार आहे.
- ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: 25 जुलै 2024
- अर्जाची शेवटची तारीख: 16 ऑगस्ट 2024
- फेज 1 परीक्षा तारीख: 8 सप्टेंबर 2024
- फेज 2 परीक्षा तारीख: 19 ऑक्टोबर 2024
अघिक माहिती साठी आमच्या टेलिग्राम चॅनेल ला भेट द्या :- टेलिग्राम चॅनेल
RBI Grade B Recruitment ची ऑफिसिअल नोटिफिकेशन PDF येथे पहा :- RBI Grade B Notification 2024
आरबीआय ग्रेड बी रिक्त जागा
RBI Grade B Recruitment 2024 मध्ये जाहीर केलेल्या notification प्रमाणे रिक्त जागा खाली प्रमाणे आहेत.
पोस्ट | रिक्त जागा |
‘बी’ श्रेणीतील अधिकारी (डीआर- जनरल) | 66 |
‘बी’ श्रेणीतील अधिकारी (डीआर)- DEPR | 21 |
‘बी’ श्रेणीतील अधिकारी (डीआर)- DSIM | 7 |
एकूण रिक्त जागा | 94 |
RBI Grade B Recruitment 2024 निवड प्रक्रिया
आरबीआय ऑफिसर ग्रेड बी भरती 2024 साठी निवड प्रक्रिया तीन प्रमुख टप्प्यांमध्ये होईल:
- फेज 1 परीक्षा (प्रीलिम्स)
- फेज 2 परीक्षा (मेन)
- इंटरव्यू
RBI Grade B Recruitment 2024 साठीची पात्रता
वयोमर्यादा
RBI ने Grade बी ऑफिसर पदासाठी किमान वय २१ आणि कमाल वय ३० वर्षे अशी पात्रता ठेवली आहे. तरी सरकार कडून आरक्षित जाती साठी ३ ते ५ वर्षे वयोमर्यादा मध्ये सूट दिलेली आहे.
- सामान्य श्रेणी: 21 ते 30 वर्षे
- ओबीसी: 3 वर्षे सवलत
- एससी/एसटी: 5 वर्षे सवलत
RBI Grade B Recruitment 2024 साठीची शैक्षणिक पात्रता
उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून पदवी पूर्ण केली असावी, आणि किमान गुण खाली दिलेल्या प्रमाणे असाने आवश्यक आहे.
- सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस: 60% गुण
- एससी/एसटी/पीडब्ल्यूडी: 50% गुण
परीक्षा पॅटर्न
रिजर्व बँक ऑफ इंडिया च्या गराडे बी पदासाठी परीक्षा पॅटर्न हा २ टप्प्याचा असणार आहे या मध्ये एक क्यलिफाईंग स्वरूपाची परीक्षा घेण्यात येईल. आणि या मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना अंतिम निवड करण्यासाठी फेज २ ची परीक्षा द्यावी लागणार आहे.
फेज 1 परीक्षा
फेज 1 परीक्षा क्वालिफाइंग स्वरूपाची आहे आणि यात खालील विभागांचा समावेश आहे:
- जनरल अवेयरनेस: 80 प्रश्न (80 गुण)
- इंग्रजी भाषा: 30 प्रश्न (30 गुण)
- क्वांटिटेटिव अँटिट्यूड : 30 प्रश्न (30 गुण)
- लॉजिकल रीझनिंग: 60 प्रश्न (60 गुण)
एकूण: 200 प्रश्न (200 गुण)
कालावधी: 120 मिनिटे
टीप: चुकीच्या उत्तरांसाठी 1/4 नेगेटिव्ह मार्किंग आहे.
फेज 2 परीक्षा
फेज 2 परीक्षा खूप महत्त्वाची आहे कारण ती अंतिम निवड ठरवते. यात तीन पेपर्स आहेत:
इकोनॉमिक आणि सोशल इश्यूज (ESI)
- ऑब्जेक्टिव्ह टाइप: 30 प्रश्न (50 गुण)
- डिस्क्रिप्टिव्ह टाइप: सब्जेक्टिव्ह प्रश्न (50 गुण)
- कालावधी: 120 मिनिटे (30 मिनिटे ऑब्जेक्टिव्ह आणि 90 मिनिटे डिस्क्रिप्टिव्ह)
इंग्रजी (लेखन कौशल्ये)
- डिस्क्रिप्टिव्ह टाइप: पत्र लेखन, निबंध लेखन, इ. (100 गुण)
- कालावधी: 90 मिनिटे
फायनान्स आणि मॅनेजमेंट
- ऑब्जेक्टिव्ह टाइप: 30 प्रश्न (50 गुण)
- डिस्क्रिप्टिव्ह टाइप: सब्जेक्टिव्ह प्रश्न (50 गुण)
- कालावधी: 120 मिनिटे (30 मिनिटे ऑब्जेक्टिव्ह आणि 90 मिनिटे डिस्क्रिप्टिव्ह)
एकूण फेज 2 परीक्षा: 300 गुण
इंटरव्यू
इंटरव्यूसाठी 75 गुणांची परीक्षा घेतली जाते. हा परीक्षा उमेदवाराच्या योग्यतेची तपासणी करण्यासाठी घेतला जातो. हा interview पर्सनल स्वरूपाचा असेल.
RBI Grade B Recruitment 2024 Apply Online
RBI Grade B Recruitment साठी ऑनलाईन अर्ज कसे करायचे या साथीचे स्टेप्स खाली दिले आहेत.
1. अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करा- आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करून सुरुवात करा.
2. अर्ज भरा- सर्व आवश्यक तपशीलांसह अर्ज भरा. मार्गदर्शक तत्त्वांनुसार आपला फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
3. अतिरिक्त दस्तऐवज अपलोड करा- तुमच्या डाव्या हाताच्या अंगठ्याच्या ठशाची स्कॅन केलेली प्रतिमा अपलोड करा.
नमूद केल्याप्रमाणे तुमच्या हस्तलिखित घोषणेची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा.
4. अर्ज फी भरा- उपलब्ध ऑनलाइन पेमेंट पर्याय वापरून अर्ज फी भरा.
5. अर्ज सबमिट करा
सर्व माहिती काळजीपूर्वक तपासूनच अर्ज सबमिट करा.
तुम्हाला आवश्यक माहिती जसे की फोन नंबर, ईमेल आयडी, पालकांची माहिती , शैक्षणिक पात्रता, अनुभव (अनिवार्य नाही), परीक्षा केंद्राची निवड इ. पर्याय व्यस्थित निवडून अर्ज सबमिट करायचा आहे.
अर्ज फी
- सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस: ₹1000
- एससी/एसटी/पीडब्ल्यूडी: ₹175
पगार आणि नोकरी प्रोफाइल
आरबीआय ऑफिसर ग्रेड बी साठी प्रारंभिक इन-हँड पगार सुमारे ₹1 लाख प्रतिमाह आहे. ही प्रतिष्ठित ग्रुप ए पोस्ट आहे ज्यात उत्कृष्ट सुविधा आणि फायदे आहेत.
नोकरी प्रोफाइलमध्ये खालील responsibility सुद्धा समाविष्ट आहेत :
- आरबीआय शाखेचे व्यवस्थापन
- विविध बँकिंग ऑपरेशन्स हाताळणे
- वातानुकूलित कार्यालयात काम करणे
बढती ची संधी
भारतीय रिजेर्व बँक (RBI) ऑफिसर ग्रेड बी साठी उत्कृष्ट बढती संधी देते, ज्यामुळे संस्थेतील उच्च पदांवर जाण्याची संधी मिळते.आणि हि संधी चा फायदा घेऊन आपण या मध्ये आपले कॅरियर या मध्ये निश्चिंत करू शकता.
मागील वर्षाचा कट-ऑफ
फेज 1 परीक्षा कट-ऑफ (2023)
- सामान्य: 54.25 गुण
- ईडब्ल्यूएस: 54.25 गुण
- ओबीसी: 54.25 गुण
- एससी: 52.75 गुण
- एसटी: 44.75 गुण
फेज 2 परीक्षा कट-ऑफ (2023)
- सामान्य: 169 गुण
- ईडब्ल्यूएस: 169 गुण
- ओबीसी: 169 गुण
- एससी: 156.25 गुण
- एसटी: 148 गुण
- पीडब्ल्यूडी: 148 गुण
अंतिम मेरिट कट-ऑफ (2023)
- सामान्य: 229.25 गुण
- ओबीसी: 221.25 गुण
- एससी: 213.25 गुण
- एसटी: 203.75 गुण
- ईडब्ल्यूएस: 194.75 गुण
तयारीसाठी काही टिप्स
- परीक्षा पॅटर्न समजून घ्या: परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम समजून घ्या.
- टाइम मॅनेजमेंट: प्रत्येक विषयासाठी विशिष्ट वेळ निश्चित करा आणि आपल्या वेळापत्रकाचे पालन करा.
- मागील वर्षांचे पेपर सोडवा: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवून प्रश्नांचा प्रकार समजून घ्या.
- मॉक टेस्ट: नियमित मॉक टेस्ट घ्या जेणेकरून आपल्या तयारीचा आढावा घेता येईल आणि गती आणि अचूकता सुधारता येईल.
- अद्ययावत रहा: चालू घडामोडी, विशेषतः अर्थव्यवस्था आणि सामाजिक विषयांवर अद्ययावत रहा.
निष्कर्ष
भरतील रिजर्व बँकेकडून जाहीर झालेल्या आरबीआय ऑफिसर ग्रेड बी भरती 2024 ही बँकिंग क्षेत्रात काम करण्याची इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. संपूर्ण निवड प्रक्रिया आणि आकर्षक पगारासह, ही एक संपूर्ण प्रतिष्ठित पोस्ट आहे. आपली तयारी लवकर सुरू करा, लक्ष केंद्रित ठेवा, आणि आपण ही प्रतिष्ठित नोकरी मिळवू शकता. तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा.
आपल्या तयारीला शुभेच्छा!
आम्ही आशा करतो कि हा लेख तुम्हाला आवडला आणि तुम्हाला आव्यश्यक ती माहिती या लेख मधून मिळाली असेल. तुम्हाला ह्या बद्दल काही doubt किंवा प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. या संभंधित आणखी माहिती साठी तुम्ही ऑफिसिअल वेबसाईट ला भेट देऊ शकता
RBI Grade B Recruitment 2024 FAQ (सतत विचारले जाणारे प्रश्न)
आरबीआय ऑफिसर ग्रेड बी भरती 2024 साठी पात्रता काय आहे?
आरबीआय ऑफिसर ग्रेड बी साठी उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून पदवी पूर्ण केली असावी. सामान्य, ओबीसी, ईडब्ल्यूएस श्रेणीसाठी किमान 60% गुण असावे आणि एससी, एसटी, पीडब्ल्यूडी श्रेणीसाठी किमान 50% गुण असावे.
आरबीआय ऑफिसर ग्रेड बी भरती 2024 वयोमर्यादा काय आहे?
सामान्य श्रेणीसाठी वयोमर्यादा 21 ते 30 वर्षे आहे. ओबीसी उमेदवारांना 3 वर्षे सवलत आणि एससी/एसटी उमेदवारांना 5 वर्षे सवलत आहे.
आरबीआय ऑफिसर ग्रेड बी पदाचा पगार किती आहे?
प्रारंभिक इन-हँड पगार सुमारे ₹1 लाख प्रतिमाह आहे.
आरबीआय ऑफिसर ग्रेड बी साठी अर्ज करण्याची महत्त्वाची तारखा कोणत्या आहेत?
RBI Grade B Recruitment 2024 अर्ज करण्यासाठीची तारीख 25 जुलै 2024 पासून 16 ऑगस्ट 2024 पर्येंत आहे
आरबीआय ऑफिसर ग्रेड बी च्या अर्जाची फी किती आहे?
अर्ज करण्याची फी सामान्य जाती साठी १०००/- रु इतका आहे आणि आरक्षित जाती साठी १७५/- रु इतका आहे.
आरबीआय ऑफिसर ग्रेड बी साठी निवड प्रक्रिया कशी आहे?
निवड प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये केली जाते फेज 1 परीक्षा (प्रीलिम्स), फेज 2 परीक्षा (मेन) आणि इंटरव्यू
RBI Grade B भरतीसाठीची फेज 1 परीक्षेचा पॅटर्न काय आहे?
फेज 1 परीक्षा क्वालिफाइंग स्वरूपाची आहे आणि यात जनरल अवेयरनेस, इंग्रजी भाषा, क्वांटिटेटिव अँटिट्यूड , आणि रीझनिंग या चार विभागांचा समावेश आहे.
RBI Grade B भरतीसाठीची फेज 2 परीक्षेचा पॅटर्न काय आहे?
फेज 2 परीक्षा तीन पेपर्समध्ये केली जाते: इकोनॉमिक आणि सोशल इश्यूज (ESI), इंग्रजी (लेखन कौशल्ये), आणि फायनान्स आणि मॅनेजमेंट.
आरबीआय ऑफिसर ग्रेड बी पदासाठी प्रमोशनची संधी आहे का?
होय, आरबीआय ऑफिसर ग्रेड बी पदासाठी उत्कृष्ट प्रमोशन संधी उपलब्ध आहे, ज्यामुळे उच्च पदांवर जाण्याची संधी मिळते.