Bigg Boss Marathi 2024 

Bigg Boss Marathi 2024 Cast: सदस्य आणि त्यांची माहिती 

निक्की तांबोळी 

खतरों के खिलाडी मध्ये  सहभाग घेतला होता. तिने आपल्या धाडसी व्यक्तिमत्वाने लोकप्रियता मिळवली.

पॅडी कांबळे 

मराठी मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध विनोदी कलाकार. त्यांची अनोखी विनोदबुद्धी आणि कॉमिक टायमिंगसाठी ओळखले जातात.

अभिजीत सावंत 

 इंडियन आयडॉलचा पहिला विजेता. "जुनून" सारख्या हिट गाण्यांसाठी ओळखले जाणारे प्लेबॅक सिंगर.

इरिना रुडाकोवा 

रशियातून आलेली मॉडेल आणि नवीन अभिनेत्री.  तिने नुकतेच अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे.

अरबाज शेख 

एमटीव्ही स्प्लिट्सविला ५ मधून प्रसिद्ध झालेला मॉडेल.  त्याच्या स्टाईल आणि करिष्मासाठी तरुणांमध्ये लोकप्रिय.

वरशा उसगावकर 

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील अनुभवी अभिनेत्री. अलीकडेच सुख म्हणजे नक्की काय अस्त या शोमधून बाहेर पडल्यामुळे चर्चेत.

वैभव चव्हाण 

मराठी टीव्हीमधील प्रसिद्ध अभिनेता.  त्याच्या बहुप्रतिभांसाठी ओळखला जातो.

अंकिता प्रभू वळवळकर 

कोकण हार्टेड गर्ल म्हणून ओळखली जाणारी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर. तिने आपल्या सर्जनशील कंटेंटने चाहत्यांना जिंकले आहे.

धनंजय पवार 

सोशल मीडियावर प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर.  त्याचा विनोदाचा दर्जा खूपच उच्च आहे.

जान्हवी किल्लेकर 

 मराठी टीव्ही सीरियल अभिनेत्री, जी तिच्या नकारात्मक भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे.  ती भाग्य दिले तू मला या सीरियलमुळे प्रसिद्ध झाली.