Yojana Doot Bharti Online Apply 2024: ग्रामीण तरुणांसाठी रोजगाराची संधी, 50,000 पदांसाठी,अर्ज कसा करावा!!

Yojana Doot Bharti Online Apply 2024
Yojana Doot Bharti Online Apply 2024

Yojana Doot Bharti Online Apply 2024 : महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना नंतर Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024 अंतर्गत 50,000 योजना दूतांच्या भरतीची घोषणा केली आहे. या योजनेचा उद्देश राज्य सरकारच्या विविध योजनांचा प्रचार करणे आणि जास्तीत जास्त नागरिकांना त्याचा लाभ मिळवून देणे आहे. या भरती च्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे, ज्यामुळे राज्यातील बेरोजगार युवकांना सरकारी नोकरी मिळवण्याची संधी आहे.

मुख्यमंत्री योजना दूत भरती साठी पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात, योजना दूत भरतीसाठी महाराष्ट्र राज्य सरकार 300 कोटी रुपये निधी मजूर केला आहे, आणि या भरती अंतर्गत, राज्य सरकारकडून राज्यातील पात्र बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

Yojana Doot Bharti 2024 साठी कसे अर्ज करायचे, भरती पात्रता काय आहे, आवश्यक कागदपत्रे, निवड प्रक्रिया इत्यादी सर्व माहिती या लेखात दिली आहे. आपण महाराष्ट्र राज्यातून आहात आणि या संधीसाठी इच्छुक असाल, तर हा लेख शेवटपर्यंत वाचा.

Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024 चा सारांश

महाराष्ट्र सरकारने 9 जुलै 2024 रोजी 50,000 योजना दूत भरतीसाठी शासन निर्णय (GR) जारी केला. या भरतीचा उद्देश राज्य सरकारच्या योजनांचा प्रचार करणे आणि जास्तीत जास्त नागरिकांना त्या योजनांचा लाभ मिळवून देणे आहे. यासोबतच, राज्यातील बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी देखील मिळणार आहे.

1) महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जन-कल्याण विभाग यांच्यामार्फत संयुक्तपणे “मुख्यमंत्री योजनादूत” हा कार्यक्रम राबविला जाणार आहे.
2)  ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी १ आणि शहरी भागात ५ हजार लोकसंख्येसाठी १ योजनादूत या प्रमाणे एकूण ५० हजार योजनादूतांची निवड करण्यात येईल.
३) मुख्यमंत्री योजनादूतास प्रत्येकी १०,००० प्रती महिना एवढे मानधन देण्यात येईल. (प्रवास खर्च, सर्व भत्ते समाविष्ट)
४) निवड झालेल्या मुख्यमंत्री योजनादूतासोबत ६ महिन्यांचा करार केला जाईल.

तपशीलमाहिती
भरतीचे नावMukhyamantri Yojana Doot Bharti
पदाचे नावYojana Doot
नोकरीचे ठिकाणमहाराष्ट्र राज्य
रिक्त पदांची संख्या50,000 पदे
नोकरीचा प्रकारसरकारी नोकरी
वेतन₹10,000 प्रति महिना
वयोमर्यादा18 ते 35 वर्षे
अर्जाची तारीखलवकरच जाहीर होईल
अधिकृत वेबसाइटलवकरच अपडेट होईल
Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024

महत्वाचे तपशील:

भरतीचे नाव: Mukhyamantri Yojana Doot Bharti
पदाचे नाव: Yojana Doot
नोकरीचे ठिकाण: महाराष्ट्र राज्य
रिक्त पदांची संख्या: 50,000 पदे
नोकरीचा प्रकार: सरकारी नोकरी
वेतन: ₹10,000 प्रति महिना
वयोमर्यादा: 18 ते 35 वर्षे
अर्जाची तारीख: लवकरच जाहीर होईल
अधिकृत वेबसाइट: लवकरच अपडेट होईल

Mukhyamantri Yojana Doot Bharti चा उद्देश

या भरतीचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांना सरकारच्या योजना समजावणे आणि त्यांचा लाभ मिळवून देणे आहे. योजनेचे प्रमोशन आणि माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे Yojana Doot चे काम असणार आहे.

भरतीची जबाबदारी महाराष्ट्र माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय व मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांनी घेतली आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करणे गरजेचे आहे.

Yojana Doot Bharti 2024 साठी पात्रता

Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024 साठी अर्ज करण्यासाठी खालील पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे:

वयोमर्यादा

अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्षे दरम्यान असावे.

शैक्षणिक पात्रता:

अर्जदाराने कोणत्याही शाखेत पदवीधर असावे.

कंप्युटर ज्ञान: बेसिक कंप्युटरचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
निवास: अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
मोबाइल फोन: अर्जदाराकडे स्वतःचा मोबाइल फोन असावा.
बँक खाते: आधार कार्डशी लिंक केलेले बँक खाते असणे आवश्यक आहे.

Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024 साठी आवश्यक कागदपत्रे

Yojana Doot Bharti 2024 साठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:

१. विहित नमुन्यातील “मुख्यमंत्री योजनादूत” काययक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज.
२. आधार कार्ड
३. पदवी प्रमाणपत्र (पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे/ प्रमाणपत्र इ.)
४. निवासाचा पुरावा (अधिवासाचा दाखला.(सक्षम यंत्रणेने वदलेला))
५. बँक खाते तपशील
६. पासपोर्ट साइज फोटो
७. हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील)

Yojana Doot Bharti Online Apply 2024

Yojana Doot Bharti 2024 साठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन असेल. सरकार लवकरच अधिकृत वेबसाइट लॉन्च करणार आहे, जिथे उमेदवार अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे:

१. अधिकृत वेबसाइटला भेट द्या: वेबसाइट उपलब्ध झाल्यानंतर अधिकृत Yojana Doot Bharti वेबसाइटला भेट द्या.
२.नोंदणी: Online Apply ऑप्शनवर क्लिक करा, आपली माहिती भरून नोंदणी फॉर्म सबमिट करा.
३. अर्ज फॉर्म: नोंदणी झाल्यानंतर, Mukhyamantri Yojana Doot Online Apply Link वर क्लिक करा.
४. आवश्यक माहिती भरा जसे की, नाव, पत्ता, वय इत्यादी.
५. कागदपत्रे अपलोड करा:आवश्यक कागदपत्रे अपलोड करा जसे की पदवी प्रमाणपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट साइज फोटो.
६. बँक तपशील: आपल्या आधार कार्डशी लिंक केलेले बँक खाते तपशील भरा.
७. अर्ज फॉर्म सबमिट करा:सर्व माहिती भरल्यानंतर आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर, अर्ज फॉर्म सबमिट करा.

    अर्ज सबमिट केल्यानंतर, भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रत आणि पावती जतन करून ठेवा.

    मुख्यमंत्री योजना दूत भरती साठी अर्ज कुठे करायचा

    मुख्यमंत्री योजना दूत साठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी कौशल्य, रोजगार उद्योजकता व नविन्यता विभागाच्या अधिकृत वेबसाईट rojgar.mahaswayam.gov.in वर नोंदणी करावी.

    Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024 साठी निवड प्रक्रिया

    Yojana Doot Bharti 2024 साठी निवड प्रक्रिया कागदपत्र पडताळणी, आणि मुलाखत अशा टप्प्यात केली जाऊ शकते. निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती लवकरच अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होईल.

    महत्वाचे मुद्दे:

    ग्रामपंचायत स्तर: एका ग्रामपंचायतीसाठी एक योजना दूत निवडला जाईल.
    शहरी भाग: प्रत्येक 5000 लोकांसाठी एक योजना दूत निवडला जाईल.
    वेतन: निवडलेल्या उमेदवारांना प्रति महिना ₹10,000 वेतन दिले जाईल.
    करार कालावधी: नियुक्ती 6 महिन्यांची असेल आणि हा करार 6 महिन्यांपेक्षा जास्त वाढवला जाणार नाही.

    निवड प्रक्रिया

    1) उमेदवारांच्या नोंदणीची व प्राप्त अर्जाच्या छाननीची प्रवक्रया माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या
    बाह्यसंस्थानामार्फत ऑनलाईनरीत्या पूणय करण्यात येणार आहे.
    2) सदरची छाननी उपरोक्त परिच्छेदात नमूद केलेल्या पात्रतेच्या निकषानुसार करण्यात येणार आहे.

    3) ऑनलाईनरीत्या प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे
    पाठवण्यात येईल जिल्हा माहिती माहिती हे जिल्हा सह्हायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेला प्रतिनिधी यांच्या समन्वयाने, प्राप्त अर्जनशी संबंधित उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करतील (यामध्ये उमेदवारांची शैक्षणिक व वयोमर्यादेविषयक मूळ कागदपत्रे तपासण्यात येतील ). त्यानंतर प्रत्येक उमेदवाराबरोबर 6 महिन्याचा करार केला जाईल. कराराचा कालावधी कोणत्याही परिस्थितीत वाढवला जाणार नाही.

    4) जिल्हा माहिती अधिकारी वरील प्रमाणे शासकीय योजनांच्या माहिती संदर्भात पात्र उमेदवारांचे समुपदेशन व निर्देशन (Orientation) करतील.
    5) जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहायक आयुक्त, (कौशल्य विकास रोजगार) व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेला प्रतिनिधी यांच्या समन्वयाने संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 /शहरी भागात 5 हजार लोकसंख्येसाठी 1 या प्रमाणात उमेदवारांना योजनादूत म्हणून पाठवले जाईल.
    6) मुख्यमंत्री योजनादूत या कार्यक्रमांतर्गत उमेदवारांना सोपववण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही. सबब, या
    नेमणूकीच्या आधारे भविष्यत शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी अथवा हक्क सांगितलं जाणार नाही याबाबतचे हमीपत्र निवड झालेल्या उमेदवाराकडून घेण्यात येणार आहे

    Yojana Doot Bharti 2024 साठी महत्वाच्या लिंक

    • Yojana Doot Online Apply: लवकरच अपडेट होईल
    • Yojana Doot Official Website: लवकरच अपडेट होईल
    • Mukhyamantri Yojana Doot GR PDF: Click Here

    निवड झालेल्या योजना दूताने करावयाची कामे

    1) योजनादूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्हातील योजनांची माहिती घेतील.
    2) प्रशिक्षित योजनादूतांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन त्यांना ठरवून वदलेले काम पार पाडणे त्यांच्यावर बंधनकारक राहील.
    3) योजनादूत राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रचार आणि प्रसिद्धी करतांना ग्राम पातळीवरील यंत्रणांशी समन्वय करून शासनाच्या
    योजनांची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करतील.
    4) योजनादूत दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा विहित नमुन्यातील अहवाल तयार करुन तो ऑनलाईन अपलोड करतील.
    5)योजनादूत त्यांना सोपवलेल्या जबाबदारीचा स्वतःच्या स्वार्थासाठी/नियमबाह्य कामासाठी उवयोग करणार नाहीत, तसेच ते गुन्हेगारी स्वरुपाचे/गैरवर्तन करणार नाहीत. योजनादूत तसे करत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यासोबत करण्यात आलेला करार संपुष्ठात आणण्यात येवून त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात येईल.
    6) योजनादूत अनधिकृतरित्या गैरहजर राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून गेल्यास त्याला मानधन अनुज्ञेय राहणार नाही.

    निष्कर्ष

    Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024 ही महाराष्ट्रातील युवकांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे. जर आपण पात्रता पूर्ण करत असाल आणि या संधीसाठी इच्छुक असाल, तर अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर लवकरात लवकर अर्ज करा.

    अधिक माहितीसाठी आणि सरकारी योजनांच्या अपडेट्ससाठी, Marathiengfusion.com ला भेट द्या.

    Telegram Group: आता सामील व्हा

    आपल्या अर्जासाठी शुभेच्छा!

    Yojana Doot Bharti 2024: वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

    1. Yojana Doot Bharti 2024 म्हणजे काय?
    Yojana Doot Bharti 2024 महाराष्ट्र राज्य सरकारची एक योजना आहे, जिथे 50,000 योजना दूतांच्या पदांसाठी भरती केली जाणार आहे. या दूतांना राज्य सरकारच्या योजनांचा प्रचार करायचा आहे.

    2. अर्जासाठी पात्रता काय आहे?
    उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षे असावे, कोणत्याही शाखेत पदवीधर असावा, बेसिक कंप्युटर ज्ञान असणे आवश्यक आहे, आणि महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

    3. Yojana Doot Bharti साठी अर्ज कसा करावा?
    ऑनलाइन अर्ज प्रक्रिया द्वारे उमेदवार अर्ज करू शकतात. अर्जासाठी अधिकृत वेबसाइट लवकरच उपलब्ध होईल.

    4. Yojana Doot Bharti 2024 साठी वेतन किती आहे?
    योजना दूतांना प्रति महिना ₹10,000 वेतन दिले जाईल.

    5. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
    अर्जाची शेवटची तारीख अधिकृत वेबसाइटवर लवकरच जाहीर केली जाईल.

    6. निवड प्रक्रिया कशी असेल?
    निवड प्रक्रिया लेखी परीक्षा, कागदपत्र पडताळणी, आणि मुलाखत यांचा समावेश असू शकतो.

    Leave a Comment